*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
माढा तालुक्यात सार्वजनिक विभाग अंतर्गत राज्य शासनाकडून खेड्यापाड्यांना जोडणारे आणि मुख्य रस्ते सुरू आहेत. या रस्त्यांचे काम अत्यंत बोगस दर्जाचे सुरू असून याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यासंदर्भात जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन ला पत्र लिहून मागणी केली होती. चौकशी करून कारवाई न झाल्यास जनशक्ती संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. जनशक्तीच्या या निवेदनाची दखल घेऊन सहा. मुख्य अभियंता एस.पी. खलाटे यांनी सोलापूर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना अहवाल मागविला आहे.
यासंदर्भात बोलताना अतुल खूपसे- पाटील म्हणाले की, माढा तालुक्यातील अत्यंत बोगस दर्जाच्या सुरू असलेल्या रस्त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र शासनाला दोन वेळा पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी मुख्य अभियंता खलाटे यांनी या संदर्भात आंदोलन करू नये अशी विनंती केली. या विनंतीनुसार जनशक्ती संघटनेने आंदोलन थांबविले. मात्र दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन सहा. मुख्य अभियंता महाराष्ट्र शासन त्यांच्याकडून सोलापूर सर्वांनी बांधकाम विभागाला अहवाल देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला असून या पत्रावर योग्य ती कार्यवाही न केल्यास जनशक्ती संघटना रस्त्यावर उतरणारच हे सर्व अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा