*श्रीपूर---बी.टी.शिवशरण.
भारतीय हिंदी सिनेसृष्टीवर ज्यांचे निर्विवाद वर्चस्व मानले जाते ते तीन खान आपला आब राखून आहेत असे आजवर वाटत होते. किंग खानच्या थाटात राहणारा शाहरुख खान, विचारवंत अभिनेता म्हणून नावाजलेला आमिर खान आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याची नेहमीच सलामी देणारा सलमान खान या तिघाही खानबंधूंची तुलना हॉलिवूडमधील मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सशी केली जाते. पैकी शाहरुख खान जगातील पहिल्या तीन सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये येतो तर आमिर खान हा एकमेव पूर्वेकडील अभिनेता आहे जो चित्रपटांमध्ये जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. सलमान खान हा देखील प्रचंड कमाई करणारा अभिनेता आहे. या तिन्ही खानांनी १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून यशस्वी कारकीर्द गाजवत ठेवली आहे तर १९९० च्या दशकापासून सतत तीन दशके भारतीय बॉक्स ऑफिसवर त्यांचे वर्चस्व टिकून आहे. गलेलठ्ठ मानधन, देशविदेशात मान, सन्मान मिळवत असलेले हे खानबंधू अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या वह्राडासमोर बँडवाल्यांप्रमाणे मनोरंजनाची सुपारी घेऊन गल्लीतल्या टपोरी पोरासारखे नाचताना पाहिले तेव्हा खरोखर त्यांची कीव आली. तडजोडवादी अभिनय सम्राट अमिताभ बच्चनचाच वारसा चालवावा, अशी कोणती मजबुरी या खानांवर आली असेल?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा