*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
गेल्या अनेक वर्षापासून नरेंद्र मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडणारे सत्यपाल मलिक यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. त्यांनी देशवासींना वाहन केले आहे की, मोदीची सत्ता उलथवून टाका.
त्यांनी एक्स वर लिहिले की, जर मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर तुमच्या मुलांचे भविष्य अंधकारमय होईल. इतकेच नाही तर जर यावेळी संधी घालवली तर तुम्हाला परत कधी मतदानाचा अधिकारही मिळणार नाही. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी लिहिले की, एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकतो की, जर २०२४ मध्ये मोदी पुन्हा सत्तेवर आले तर येणाऱ्या काळात तुमच्या मुलांचे भविष्य अंधकारमय होईल.
सत्यपाल मलिक यांनी लिहिले की, सर्व देशवासीयांना माझे आवाहन आहे की, यावेळी निवडणुकीत तुम्ही सर्वांनी जात- धर्म न पाहता भाजपला हरवण्यासाठी मतदान करा. सत्तेत बसलेले लोक देशाला आतून पोखरत आहेत. काही भांडवलदारांसाठी देश लुटला जात आहे. तरुण बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत. महागाई गगनाला भिडली आहे. सरकारी रुग्णालये व सरकारी शाळा बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर तुम्ही आपल्या मुलांचे भविष्य उज्जल करणार असाल. महागाईपासून सुटकारा पाहिजे असेल, देशाला वाचवणार असाल तर मोदी सरकारला सत्तेतून उलथवून टाका.
सत्यपाल मलिक यांनी पुढे लिहिले की, जर यावेळी तुम्ही संधी घालवली तर पुन्हा तुम्हाला कधी मतदान करण्याचा अधिकार मिळणार नाही. याआधी सत्यपाल मलिकने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा विरोध करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यांनी म्हटले की, मी आधीच सांगितले होते की, निवडणुकीच्या आधी अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाईल. सत्यपाल मलिक यांनी केजरीवाल यांच्या अटकेसाठी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. त्यांनी लिहिले होते की, सत्तेवर बसलेला हुकूमशहा डरपोक माणूस आहे. जो देशाच्या सरकारी एजन्सीचा गैरवापर करत आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक करत मोदी सरकारने आपल्या शवपेटीवर अखेरचा खिळा ठोकला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा