*उपसंपादिका-----नुरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
माळीनगर येथील दि मॉडेल विविधांगी प्रशाला माळीनगर मधील सन १९९८-९९ च्या इयत्ता १० वी तुकडी अ बॅचचा रौप्यमहोत्सव माजी विद्यार्थी स्नेहमेळावा समारंभ नुकताच शालेय आवारात मोठ्या उत्साहात पार पडला.
अमेरिकेतून सुट्टीला आलेले माजी विद्यार्थी अभिजित साळुंखे यांच्या नियोजनाला त्यांचे वर्गमित्र विनोद मदने,जयदीप कांबळे, रमेश बुवा,प्रसाद भुजबळ, बाबासाहेब कारंडे,पायल जोशी, श्रद्धा राऊत,स्नेहल भातलवंडे, शीतल यादव गोरे यांची मिळालेली साथ आणि प्रशालेचे शिक्षक बाळासाहेब सोनवणे व रणजीत लोहार यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम सुंदररित्या संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक कल्लाप्पा बिराजदार,माजी शिक्षक सतीश साबडे,हरी मलवडकर,किशोर कुलकर्णी,प्रकाश चवरे,सौ.भांदुर्गे मॅडम आणि पुणे,मुंबई,सातारा, कोल्हापूर अश्या विविध ठिकाणा वरून आलेले अनेक विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या २५ वर्ष जुन्या आठवणींच्या सानिध्यात स्नेहभोजन आणि काही मनोरंजक खेळ खेळून पूर्ण दिवस आनंदात घालवला. आजी-माजी शिक्षकाकडून मिळालेले मार्गदर्शन,कौतुक आणि भावी आयुष्यासाठी मिळालेल्या शुभेच्छा घेत आणि परत भेटण्याची इच्छा व्यक्त करत सर्वजण संध्याकाळी मार्गस्थ झाले.प्रशालेतर्फे सर्व माजी विद्यार्थ्यांना असे कार्यक्रम करण्यासाठी आवाहन करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा