Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २९ मार्च, २०२४

*"रंगपंचमी निमित्त*

 


*रंगपंचमी*


आली आली रंगपंचमी

रंग खेळू या लहान थोर

रंग उडवून हसत नाचत

विविध रंगात न्हाली पोरं ॥ १ ॥ 


साजरा करू या रंगोत्सव

सप्तरंगात न्हाऊनी आज

वसंत ऋतुच्या आगमनाने

सृष्टीत नवचैतन्याचा साज ॥२ ॥


फाल्गुन वद्य पंचमीस 

 येई रंगपंचमीचा सण 

निसर्गाशी होण्या एकरूप 

सप्तरंगाची करू उधळण॥ ३ ॥


भेदभाव सारे विसरून

रंग खेळू प्रदूषणविरहीत 

रंगात रंगूनी जावे आज 

आपुल्या बेधुंद प्रीतीचे गीत ॥४॥


रंगमय गोकुळ नगरी सारी

राधाकृष्ण खेळती हो रंग

इंद्रधनुसम अवनी भासे जणू

गुलाल उधळतो सखा तो श्रीरंग ५ ॥


    कवियत्री

 सुवर्णा घोरपडे

संग्रामनगर-अकलूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा