Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १६ मार्च, २०२४

*फलटण येथे आज झालेल्या "आर. पी. आय." आठवले गटाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या संतप्त भावना*

 


*ज्येष्ठ पञकार--बी.टी.शिवशरण

              आज फलटण येथे पश्चिम महाराष्ट्रातील आरपीआय आठवले गटाचे प्रमुख कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणूकीत आरपीआयची सन्माननीय युती असतानाही मित्र पक्ष आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा मित्र पक्षाचे पोष्टर वर फोटो न टाकणे निळे झेंडे न वापरणे तसेच स्थानिक कार्यकर्त्यांना निवडणूक प्रक्रियेत सामावून न घेणे या तक्रारी बरोबरच आरपीआय ला शिर्डी व सोलापूर या दोन जागा सोडण्यास निर्णय न घेणे या संदर्भात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या या बैठकीला माळशिरस फलटण माण खटाव दहिवडी सांगोला सातारा माढा करमाळा येथील पदाधिकारी उपस्थित होते भाजपने आरपीआयला शिर्डी व सोलापूर येथील जागा सोडली नाही तर कोणत्याही परिस्थितीत भाजपचा प्रचार करणार नाही तसेच मतदान करणार नाही असा इशारा देण्यात आला आज निवडणूक तारखा जाहीर झाल्या आहेत तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या निर्णयाकडे महाराष्ट्रातील आरपीआय कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा