Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १६ मार्च, २०२४

*भारत सरकारचे नोटरी पब्लिक सोपदी "ॲड- विजयकुमार ताटे देशमुख" यांची निवड.*

 


*कोल्हापूर-----प्रतिनिधी*

*केदार ----लोहकरे*

 *टाइम्स 45 न्युज मराठी

              भारत सरकारचे विधी व न्याय विभागाच्या वतीने सन २०२२ या वर्षात परिक्षा घेणेत आली होती.त्याचा निकाल १४ मार्च रोजी प्रसिद्ध झाला.त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी सचिव ॲड.विजयकुमार विठ्ठलराव ताटे-देशमुख यांची भारत सरकार नोटरी पब्लिकसो पदी निवड झाली आहे त्यामूळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन करणेत येत आहे. 

                 ॲड.विजयकुमार ताटे-देशमुख हे कोल्हापूर जिल्हा न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरूपाची वकिली व्यवसाय गेली १५ वर्षापासुन करीत आहेत. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे साचिव म्हणून कामकाज पाहिले आहे.ॲड.ताटे देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण माळशिरस तालुक्यातील संगम (जि सोलापूर) येथील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे.तसेच माध्यमिक शिक्षण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात येथे पूर्ण झाले आहे कोल्हापूर येथील न्यू लॉ कॉलेजमधून वकिली पदवी घेतली व शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथे एल.एल.एम पदवी घेतली आहे.त्यांचे नोटरी पब्लिक पदी निवड झाल्यामुळे सर्वांना लीगल सेवा तत्पर मिळणार आहे व सर्व सामान्य लोकांचा वेळ, श्रम वाचणार आहे.त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा