*विशेष--प्रतिनिधी*
*राजु(कासिम)-मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी.
मेट्रो ब्रेन अबॅकस कंपनी आयोजित सहावी नॅशनल लेवल अबॅकस परीक्षा लातूर येथे पार पडली. यामध्ये अकलूज येथील यश अबॅकस अकॅडमीच्या वर्षभरातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील सर्वोत्तम शाखेचा मानाचा "बेस्ट फ्रॅंचाईजी ऑफ द इयर 2024" या पुरस्काराने अकॅडमीच्या संचालिका सौ. उर्मिला सुरवसे मॅडम यांना सन्मानित करण्यात आले.
अकॅडमीच्या 11 विद्यार्थ्यांनी नॅशनल लेव्हल आणि 8 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय अबॅकस परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश संपादन केल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यश अबॅकस अकॅडमी च्या वतीने 10 मार्च रोजी अकलूज येथे घेण्यात आला.
नॅशनल लेव्हल परीक्षेत शिवबा राजेंद्र सावंत, सई गणेश गोडसे, स्वयम निखिल शेटे, समर्थ विलास करे, श्रीतेज संतोष आडत या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक तर अर्णव विनय गायकवाड, आझमिया मगदूम पठाण, अनय दीपक देशमाने, प्रज्ञा प्रवीण शिंदे, मिताली अनुप दोशी या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक यश नितीन सुरवसे तृतीय क्रमांक पटकाविला.
राज्यस्तरीय अबॅकस परीक्षेत सई गणेश गोडसे-प्रथम, अद्विक अमोल बनपट्टे-द्वितीय, समर्जित मल्हार माळी-तृतीय, सिनीन शाकीर शेख, आरव अरुण पवार, कृष्णाली राहुल पवळ, शिवबा राजेंद्र सावंत यांनी चतुर्थ क्रमांक मिळवून यश संपादन केले.
अबॅकस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच अकॅडमीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अकलूज येथील रूपा बॅकवेट हॉल येथे पार पडला.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष मा. श्री. संतोष लोहारे, मेट्रोब्रेन अबॅकस कंपनीच्या संचालिका सीमा लोहारे, राधेश्याम सांगवे, रोटरी क्लब अकलूज चे अध्यक्ष ओजस डोभाडा, सीए. नितीन कुदळे, डॉ. अभिजीत मगर' डॉ. शीतल शेटे, पोलीस उपनिरीक्षक स्वाती कांबळे, मनीष गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
अकॅडमी च्या संचालिका सौ. उर्मिला सुरवसे मॅडम यांनी सर्व अनाथ विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण देण्याचे जाहीर केले. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजाराम गुजर सर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा