Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २३ एप्रिल, २०२४

*महाळुंग मंडल मधील 14 गावांचे मतदार नेमके कोणाच्या पाठीमागे*

 


*ज्येष्ठ पत्रकार ----बी .टी. शिवशरण*


लोकसभा निवडणूक लागली आहे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील व भाजप कडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर वंचित बहुजन आघाडी कडुन रमेश बारसकर व इतर काही अपक्ष व लहान पक्षाचे तीन ते चार उमेदवार निवडणुक रिंगणात आपापले नशीब अजमावत आहेत खरी लढत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन पक्षांच्या उमेदवारात होत आहे महाळुंग मंडल मधील चौदा गावं माढा विधानसभा व लोकसभा निवडणुकीत जोडली आहेत गेल्या पंचवार्षिक ला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे यांनी या चौदा गावांसाठी काय विकास केला व कोणते नवीन प्रकल्प कार्यान्वित केले हे लक्षात घेतले तर काही किरकोळ कामे वगळता कोणतेही भरीव ठोस काम दोघांकडून झाले नाही असेच म्हणता येईल माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील घराणे श आमदार बबनराव शिंदे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात राजकीय वैमनस्य आहे माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे तर टेंभुर्णी पासून कुर्डुवाडी करमाळा पर्यंत आमदार बबनराव शिंदे यांचे राजकीय वजन आहे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फलटण चे आहेत ते माढा लोकसभा मतदारसंघात तसे उपरे उमेदवार म्हणता येतील पण भाजपचे ते अनधिकृत उमेदवार गत पंचवार्षिक ला होते ते निवडून आले होते यावेळी पुन्हा भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली आहे गेल्या वेळी त्यांना मोहिते पाटील यांची साथ राहिली होती या वेळी मोहिते पाटील यांनी त्यांना विरोध केला आहे व त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे त्यांना फलटण माण सांगोला करमाळा माढा माळशिरस तालुक्यातील अनेक गट संघटना पक्ष यांनी पाठिंबा जाहीर केला आहे त्यांचे सध्या तरी पारडे जड आहे या सर्व पार्श्वभूमीवर महाळुंग मंडल मधील चौदा गावांचे मतदान हे धैर्यशील मोहिते पाटील यांना जाणार असे दिसून येते कारण मोहिते पाटील यांचे या चौदा गावात प्राबल्य आहे या सर्व गावांत मोहिते पाटील यांचेच कार्यकर्ते नेते तसेच मोहिते पाटील यांचेवर प्रेम करणारे आहेत माढा विधानसभा आमदार बबनराव शिंदे यांनी या गावातील त्यांचेकडे जाणारे नेते कार्यकर्ते यांची वैयक्तिक कामे केली पण सार्वजनिक तसेच जनतेची सार्वजनिक कामे करताना हात आखडता घेतला आहे अशी ओरड आहे जत्रा यात्रा जयंती उरुस यांना काही ठराविक वर्गणी देणं एवढंच काम आमदारांनी केल्याचं बोललं जातं आहे विकास कामे झालेली नाहीत खासदारांचे काम पाहिले तर महाळुंग येथील यमाई देवी मंदिर सभामंडप कल्लोळ हे काम गेली अनेक वर्षे प्रलंबित होते पुरातत्व खात्याकडे सदर विषय असल्याने ते काम रेंगाळले होते पण महाळुंग येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेत्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कडे पाठपुरावा केला व पुरातत्व खात्याकडून यमाई देवी मंदिर सभामंडप कल्लोळ यांचे काम मार्गी लावले तेवढेच ते एकमेव कामं म्हणतां येईल अशी चर्चा आहे आमदार बबनराव शिंदे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कडून या भागातील काही नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांची वैयक्तिक कामे करून घेतली असल्याचे बोलले जाते मात्र सर्वसामान्य जनतेला काय मिळाले हा प्रश्न अनुत्तरित आहे मोहिते पाटील व नाईक निंबाळकर बबनराव शिंदे यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे मतदार जागृत व सुजान आहे त्यामुळे अंधविश्वास ठेवून व खोट्या भुलथापांना बळी पडणार नाहीत त्यामुळे माढा लोकसभा निवडणूक ही भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यात अत्यंत चुरशीची होईल असं वाटत होते पण धैर्यशील मोहिते पाटील यांना फलटण माण माळशिरस सांगोला माढा करमाळा तालुक्यातील वाढता पाठिंबा पहाता ही लढत एकतर्फी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे एकंदरीत वातावरण निर्माण झाले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा