Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४

दि.सासवड माळी एज्युकेशन सोसायटी सचिव पदी-अजय गिरमे ,खजिनदारपदी-कल्पेश पांढरे तर उपाध्यक्षपदी-नितीन इनामके यांची निवड.

 

*विशेष ----प्रतिनिधी*

 *एहसान ---मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9096 837 451


माळीनगर,ता.येथील दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या सचिवपदी अजय गिरमे व खजिनदारपदी कल्पेश पांढरे यांची निवड झाली आहे.उपाध्यक्षपदी नितीन इनामके यांना पुन्हा संधी मिळाली आहे.


पदाधिकाऱ्यांची निवड व अन्य विषयांसाठी संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवारी (ता.१६) झाली.संस्थाध्यक्ष राजेंद्र गिरमे बैठकीस अनुपस्थित असल्याने विश्वस्त अरविंद जाधव यांना सर्वानुमते बैठकीच्या अध्यक्ष करण्यात आले.त्यांच्या अध्यक्षस्थानी पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या.उपाध्यक्ष,सचिव व खजिनदार यांची ३१ मार्चला मुदत संपली होती.


आधीचे सचिव प्रकाश गिरमे यांच्या जागी अजय गिरमे यांची मतदानाद्वारे निवड झाली.अजय गिरमे पाच वर्षांपासून संचालक मंडळात असून त्यांनी यापूर्वी संस्थेचे उपाध्यक्षपद भूषविले आहे.नितीन इनामके यांची उपाध्यक्षपदी अविरोध फेरनिवड झाली आहे.कल्पेश पांढरे हे पाच वर्षांपासून संचालकपदी आहेत.पृथ्वीराज भोंगळे यांच्या जागी त्यांची यावेळी खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली आहे.तसेच विजयकांत कुदळे,अरविंद जाधव,सूर्यकांत बोरावके,चंद्रकांत जगताप यांची पुन्हा सहा वर्षांसाठी विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली.यावेळी विश्वस्त चंद्रकांत जगताप,संचालक अशोक गिरमे,प्रकाश गिरमे,रत्नदीप बोरावके,डॉ.अविनाश जाधव,अनिल रासकर,ऍड.सचिन बधे,पृथ्वीराज भोंगळे,लीना गिरमे,ज्योती लांडगे उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा