Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २८ एप्रिल, २०२४

*इंडोनेशियात 6.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंप ----समुद्रात महाकाय लाटा निर्माण.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात शनिवारी रात्री ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. ज्यामुळे समुद्रात महाकाय लाटा निर्माण झाल्या होत्या. त्याबाबतची माहिती हवामानशास्त्र संस्थांनी दिली. जकार्ता येथील वेळेनुसार शनिवारी साडे अकरा वाजता भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू गरुत रीजेंसीपासून 151 किमी नैऋत्येस आणि 10 किमी खोलीवर होता.भूकंपाचे धक्के इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आणि नजीकच्या बांटेन प्रांतात तसेच मध्य जावा, योग्याकार्टा आणि पूर्व जावा प्रांतातही जाणवले.




पश्चिम जावा प्रांतात, सुकाबुमी शहर आणि तासिकमलया शहरामध्ये आणि पश्चिम जावा प्रांतात असलेल्या बांडुंग शहरात भूकंपाची तीव्रता जाणवली, असे तिथल्या स्थानिक वृत्तसंस्थांचे म्हणणे आहे. इंडोनेशिया हा देश "पॅसिफिक रिंग ऑफ फायर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असुरक्षित भूकंपग्रस्त क्षेत्रात येत असल्याने तिथे सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा