*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
तुरडाळीसह अन्न डाळींचे भाव अवघ्या आठवड्याभरात कडाडले असून दरात सरासरी पाच रुपयांची वाढ झाली आहे किरकोळ बाजारात तुरडाळीचे दर 180 ते 185 रुपयापर्यंत पोहोचले आहेत.
अपुऱ्या पुरवठ्यामुळे गेल्या वर्षभरापासूनच तूरडाळीचे दर चढलेच आहेत अपुरा पाऊस काढणीच्या वेळी झालेला अवकाळी पाऊस इत्यादी कारणांमुळे तूर डाळीच्या उत्पादनात घट झाली आहे. आठवडाभरात तूर डाळीच्या दरात प्रति किलो सरासरी पाच रुपयाची वाढ झाली तर चणाडाळीच्या दरात सरासरी चार रुपयांची वाढ झाली असून चणाडाळ 85 ते 90 रुपये किलोवर आहे मूग डाळीचे दर 130 ते 150 रुपये किलो तर उडीद डाळीचे दर 140 ते 150 रुपयांवर गेले आहेत.
प्रत्यक्ष लागवडीच्या वेळेला अपुरा पाऊस काढणीच्या वेळेला झालेला पाऊस इत्यादी कारणांसोबतच तुरीपासून डाळ तयार करताना उताराही कमी मिळत आहे दर्जा निहाय शंभर किलो तुरीपासून 65 ते 80 किलो डाळ मिळते एक किलो डाळ तयार करण्यासाठी साधारण 15 रुपये खर्च येतो त्यामुळे जून जुलैमध्ये तूरडाळीच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. तुरडाळीची मुख्य आयात म्यानमार मधून केली जाते परंतु तेथूनही अपेक्षेप्रमाणे आयात होत नसल्यामुळे तुरडाळीचे दर चढेच राहण्याचे संकेत मिळत आहेत.
दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेल्या डाळी तेल कांदे बटाटे यांच्या महागाईवर सरकारने नियंत्रण ठेवावे अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेची असते. यापूर्वीही काँगेस काळात कांद्याच्या दरामुळे केंद्र सरकारला जनतेच्या असंतोषाला मतपेटीतून सामोरे जावे लागले होते याच्या आठवणी ताज्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र वाढलेली महागाई आणि त्यातच डाळीने खाल्लेला भाव हा निवडणुकीमध्ये परिणाम करेल का याबद्दल राजकीय विश्लेषक आता चर्चा करू लागले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा