*अकलुज ---- प्रतिनिधी*
**केदार----लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
वर्गाध्यापनात दुर्लक्ष करणे म्हणजे शिक्षकांचा भ्रष्टाचार असून त्यापासून शिक्षकांनी दूर राहिले पाहिजे.प्रत्येक शिक्षकाने आत्मपरीक्षण केले पाहिजे. आपले ज्ञान अद्यावत केले पाहिजे.सखोल अभ्यास करत मन लावून,जीव ओतून काम केले पाहिजे.सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास सर्व जग आनंदी व समाधानी दिसेल,"असे मत इस्लामपूर येथील वसंत कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉ.ए.एम.पाटील यांनी व्यक्त केले.
कोडोली (ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी- शिक्षकांना परीक्षेच्या व व्यावसायिक शुभेच्छा समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील होते. याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी डॉ. जयंत पाटील,संस्थाध्यक्षा पद्मजादेवी पाटील आणि विश्वस्त विनिता जयंत पाटील यांनी विद्यार्थी-शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
गुरूऋणातून व महाविद्यालयाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शुभेच्छामूर्ती विद्यार्थी-शिक्षकांनी महाविद्यालयाच्या परीक्षा विभागास अद्ययावत लोखंडी कपाट स्वेच्छेने भेट दिले तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थी-शिक्षकांनी आपल्या ज्येष्ठ विद्यार्थी बंधू - भगिनिंसाठी भोजनाचा बेत आखला होता.याप्रसंगी महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या व शिक्षणतज्ञ प्रा.श्रीमती सुमन जोसेफ गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पाककृतीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी- शिक्षकांबरोबरच धावण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.
याप्रसंगी सत्कारमूर्ती सुमन गायकवाड यांच्यासह प्रा. एस.डी.रक्ताडे,प्रा.श्रीमती गुलनास मुजावर,ऐश्वर्या पोतदार, पद्मश्री पाटील,श्रीकांत तडवळे, सुभाष चौगले आदींनी मनोगतातून भावनांना वाट मोकळी करून दिली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना भावूक होवून प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील म्हणाले, " कुटुंबात जसे आई -वडिलांचे मुलांशी नाते असते तसेच नाते शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे असते. मुलगी नांदायला जाताना आई - वडिलांना जशा यातना होतात तशा यातना शिक्षकांना आपले विद्यार्थी आपल्यापासून दूर जाताना होतात."
परीक्षा विभाग प्रमुख प्रा.संजय जाधव यांनी प्रास्तविकात पाहुण्यांचा परिचय करून दिला.माधुरी पाटील आणि पद्मश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले.सीमा चोपडे यांनी आभार मानले.प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती आणि संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कै.आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्या प्रतिमांची पूजा करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा