Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १३ एप्रिल, २०२४

*"राज ठाकरे "यांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर--- मनसैनिकांचा ठाकरेंना भावनिक पत्र..*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


मुंबई - 13 एप्रिल :* नेहमीच सत्ताधारी पक्षांना आपल्या भाषणातून ठोकून काढणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात वेगळी भूमिका घेतली. त्यांनी भाजपला लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा दिला. या पाठिंब्यानंतर काही मनसैनिक नाराज झाले, तर काहींनी चक्क पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. मात्र काहींनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. अशाच एका मनसैनिकाने राज ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिले आहे. जे सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

पत्रात नेमके काय लिहिले आहे ?

‘आदरणीय साहेब, सर्वप्रथम तुम्हाला सस्नेह जय महाराष्ट्र! नुकताच आपला गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर साजरा झाला. या मेळाव्यात आपण जी भूमिका घेतली, ती अतिशय योग्य असून आम्हाला आपण घेतलेली भूमिका मनापासून मान्य आहे. आपला आदेश आम्हाला शिरसावंद्य होता, आहे आणि राहील. आपल्या आदेशाचे आम्ही तंतोतंत पालन करु. साहेब, 2006 पासून आम्ही "तुम्ही ठरवाल ते धोरण आणि तुम्ही बांधाल ते तोरण" या वाक्यानुरूप वाटचाल करत आलोय आणि यापुढेही त्यात तसूभरही बदल होणार नाही. आपलाच, महाराष्ट्र सैनिक’, असा मजकूर या पत्रात लिहिलेला आहे. मात्र या पत्रावर कोणाचेही नाव नाही. त्यामुळे पत्र नेमके कोणी लिहिले ते स्पष्ट झालेले नाही.

राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे राज्यात आणखी एक नवीन समीकरण तयार झाले आहे. दोन्ही पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आले असल्याची भावना मनसैनिकांच्या मनात आहे. मात्र नेहमीच मागच्या निवडणुकावेळी आपल्या भाषणाच्या माध्यमातून भाजपच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढणारे राज ठाकरे आता भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार असल्यामुळे काही मनसैनिक हे नाराज झालेले दिसत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा