क्रांतिसूर्य
डॉ . बाबासाहेब आंबेडकर
जन्मले भारतीय क्रांतीसुर्य
महदभाग्य उजळले आमचे
किती सांगावे महान कार्य ॥ १ ॥
गावकुसा बाहेरच्यांना
मिळवून दिला खरा मान
चवदार तळ्याच्या पाण्याने
भागवली आपली तहान ॥२ ॥
तुमच्या रूपाने लाभले
एक प्रभावी तेजस्वी नेतृत्व
शैक्षणिक सामाजिक क्रांतीने
जगी सिद्ध तुमचे कर्तृत्व ॥३ ॥
असमानतेचा निषेध करून
मिळवून दिले आम्हांअधिकार
लिहुनी भारताचे संविधान बनले
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार॥ ४ ॥
तुमच्या महान कार्याची
गाऊ किती यशोगाथा
उच्चविद्या विभूषिता चरणी
अभिमानाने टेकविते माथा ॥ ५ ॥
कवयित्री
सुवर्णा घोरपडे
अकलूज (सोलापूर )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा