*अकलुज----प्रतिनिधी*
*लक्ष्मीकांत ---कुरुडकर*-
*टाइम्स 45 न्युज मराठी
मागील वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतीला तर पाणी उपलब्ध नसून माळशिरस तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून सर्व पक्षाचे राजकीय नेते मात्र प्रचारात व्यस्त आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्याकडे नेत्यांचे दुर्लक्ष असून अकलूज नगर परिषदेकडून सहा दिवसाला एक दिवस पाणी सोडले जात आहे
विशेषतः गतवर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने शेतीच्या पिकाला पाणी नाही ज्यांच्याकडे थोडेफार पाणी आहे त्यांनाही दिवसा लाईट उपलब्ध होत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी पिकाला पाणी द्यावे लागत आहे रात्रीच्या वेळी शेतात वेगवेगळ्या वावरात जाऊन ठिबक सिंचनचे कॉक फिरवून पाणी चालू बंद करण्यासाठी अहोरात्र राबत आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देण्यासाठी जागरण करावे लागत आहे
ऊस केळी डाळिंब इत्यादी नगदी पिकाला ठिबक सिंचनाद्वारे पाणी चालू असताना ठिबक सिंचनाचे पाईप चोऱ्या करण्याचे प्रकार वाढल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे शिवाय ठिबक सिंचनासाठी एकरी 40 ते 45 हजार रुपये खर्च येतो एका एका शेतकऱ्याचे पाच पाच एकराचे ठिबक असून ते चोरीला जात आहेत (बाराभाई गट )टिळेकर वस्ती येथील प्रगतशील बागायतदार" दत्तात्रय एकतपुरे" यांचे चार एकराचे ठिबक आणि प्रशांत फुले यांचे तीन एकरातील ठिबक चोरीला गेले असल्यामुळे या परिसरातील शेतकरी एकत्र येऊन रात्रभर जागून ठिबक सिंचन चे राखण करून चोरीपासून बचाव करत आहेत तसेच याच परिसरात काही दिवसापूर्वी अमित टिळेकर यांचे ठिबक सिंचन संच चोरीला गेल्यानंतर त्यांनी रीतसर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला मात्र पोलिसांकडून त्याचा अद्याप तपास लागला नाही तरी पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून ठिबक सिंचन चोरी करणाऱ्या चोरांचा तपास लावून त्यांच्यावर कारवाई करावी अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे याचा परिणाम म्हणून शेतकऱ्याला आर्थिक भर दंड सोसावा लागत आहे शिवाय ठिबक सिंचन संच नवीन आणणे गरजेचे असते कारण ठिबक सिंचन आणले नाहीत तर जळण्याची भीती निर्माण होत आहे अशा प्रकारे शेतकरी" आसमानी व सुलतानी" संकटात सापडला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा