Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २२ एप्रिल, २०२४

*वसुंधरा दिन-जपू वृक्षवेली*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


*🌳 वसुंधरा दिन 🌳*


नित्यरोज सुप्रभाती

अवनीस नमस्कार

निसर्गात रमताना

किती बरे चमत्कार ॥ १ ॥


आज इथं धरित्रीने

किती सोसावा तो भार

पर्यावरणरक्षण

सुखी जीवनाचं सार ॥ २ ॥


जपू निसर्गसृष्टीत

वृक्षवेली वृक्षछाया

देण्या सकला सावली

वृक्ष झिजवती काया ॥ ३ ॥


सिमेंटच्या जंगलात

झाड गेली दूर दूर

नको होऊस मनुजा

आज इतका तु क्रुर ॥४ ॥ 


काळ्या आईच्या कुशीत

एक तरी झाड लाव

अस्मानी त्या संकटांना

निसर्गाची शक्ती दाव ॥ ५ ॥


फेडू ऋण धरित्रीचे

रक्षुनिया ऑक्सिजन 

रम्य निसर्ग सृष्टीत

हर्षे वसुंधरा मन ॥६ ॥


    *कवयित्री*

  *सुवर्णा घोरपडे*

 संग्रामनगर अकलूज 

ता.माळशिरस जि.सोलापूर.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा