*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
पिढ्या दर पिढ्या चालणाऱ्या कोर्ट कचेरी, कज्जे यामधील महत्वाच्या दुव्याची अर्थात वकिलांची *काळा कोट* ही ओळख आहे, मात्र सध्याचा उन्हाळा खूपच कडक आहे. उन्हाळ्यात काळा रंग वापरू नये, असा सल्ला नेहमीच दिला जातो. कडक उन्हाळ्यात काळे कपडे घातल्याने खूप त्रास होत असल्याची तक्रार वकिलांनी केली आहे. हा काळा कोट बदलण्यात यावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे, वकिलांपासून काळा कोट वेगळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्व राज्यांच्या बार काउन्सिलना या संदर्भात न्यायालयाने आदेश द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच कोणत्या महिन्यात काळा कोट घातल्याने त्रास होईल, त्या महिन्यांची यादी तयार करण्यास सांगण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या काळात काळे कपडे घातल्याने काय त्रास होऊ शकतो, याचा अभ्यास करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना करण्यास सांगण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात काळा कोट घातल्याने तब्येतीवर, कार्यक्षमतेवर कशा पद्धतीने विपरीत परिणाम होतो, याचाही अभ्यास व्हायला हवा, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
काळा रंग हा उष्णतेला आकर्षित करतो. यामुळेच उन्हाळ्यात वकिलांचे कपडे चांगलेच तापतात, आणि त्याचा आपल्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होतो. चांगल्या आणि सुरक्षित वातावरणात काम करणे हा सगळ्यांचाच अधिकार आहे. मग, हा अधिकार वकिलांना का नाही? वकिलांचे काळे कोट घालून फिरणे हे उन्हाळ्यात फारच जिकिरीचे असते. याचा त्यांच्या कामावर देखील परिणाम होतो. त्यामुळेच किमान उन्हाळ्यात तरी हे कपडे बदलण्यात यावेळी, असे याचिकाकर्त्यांने पुढे म्हटले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा