*माळीनगर ----प्रतिनिधी*
*गणेश करडे सर
संग्रामनगर ता. माळशिरस येथील शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालयाचा एस.एस.सी.परिक्षा २०२४ चा निकाल ९६.६१ % लागला असून यापरिक्षेत ५९ विद्यार्थी परिक्षेस बसले होते त्यापैकी ५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये कु. शिंदे कल्याणी अंकुश हिने ८९.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आणि कु.कदम ज्ञानेश्वरी रघुनाथ हिने ८७.६०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर चि.अनपट रोहन गोपाळ याने ८५.००%गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मल्हारी घुले,रशीद मुलाणी,विजया पेटकर,सुरेश माने,आरती दोरकर, रोहिणी गायकवाड, संतोष कदम, गणेश म्हसवडे, सतिश एकतपुरे आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील (बाळदादासाहेब), संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहीते-पाटील (आण्णासाहेब), संचालिका स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील(दिदीसाहेब), सचिव अभिजित रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे, प्रशाला समिती सभापती निशा गिरमे, सदस्य महादेव अंधारे, यशवंत साळुंखे आणि सर्व सदस्य, मुख्याध्यापक मल्हारी घुले सर यांचे वतीने सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा