*श्रीपूर--बी.टी.शिवशरण
माढा लोकसभा निवडणुकीत कोण निवडून येणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच महाळुंग श्रीपूर मध्ये एकच चर्चा रंगली आहे बुलेट गाडी कोण जिंकणार त्याचे असे झाले की महाळुंग श्रीपूर नगरपंचायत चे विद्यमान नगरसेवक तानाजी भगत व विद्यमान नगरसेविका पती विक्रम लाटे या दोघांनी बुलेट गाडी ची पैज लावली आहे नगरसेवक तानाजी भगत हे मोहिते पाटील समर्थक असून त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील हेच माढा लोकसभा मतदारसंघात निवडून येणार अशी पैज लावली आहे तर विक्रम लाटे हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक आहेत निंबाळकर हेच मोठ्या मताधिक्याने निवडून येणार म्हणून लाटे यांनी बुलेट गाडी ची पैज लावली आहे ज्याचा अंदाज खरा ठरेल त्याला बुलेट गाडी देण्यात येणार आहे चार जुन ला लोकसभा निवडणूक निकाल आहे या निकालाकडे माढा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे महाळुंग श्रीपूर पंचक्रोशीत या बुलेट पैजची चर्चा जोरात सुरु आहे कोण बुलेट जिंकणार याची भगत व लाटे समर्थकांत उत्सुकता आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा