Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३१ मे, २०२४

*भाजपला बहुमत मिळणार नाही तर इंडिया आघाडी वरचढ ठरेल पहा---" योगेंद्र यादव" यांचे गणित*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

नवी दिल्ली :- देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान येत्या 1 जून रोजी पार पडणार आहे. त्यानंतर सर्वांच्या नजरा या एक्झिट पोल आणि 4 जूनला लागणाऱ्या निकालाकडे लागलेल्या आहेत. मात्र, त्याआधी राजकारणी ते निवडणूक विश्लेषक बनलेल्या योगेंद्र यादव यांनी मोठा दावा करत मोदींसह भाजपचं टेन्शन वाढवलं आहे. द वायर’ या न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

यंदाच्या लोकसभा निवडणूकीत भाजपला बहुमत मिळणार नाही असे भाकित यादव यांनी केले आहे. तर, इंडिया आघाडीबाबतही यादव यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या या भाकितामुळे भाजपच्या गोटात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, 4 जूनला निकाल आल्यानंतर यादव यांचे भाकित कितपत खरे ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपला सुमारे 50 जागा कमी पडू शकतात असा अंदाज यादव यांनी व्यक्त केला आहे.

कोण किती जागा जिंकणार काय म्हणाले योगेंद्र यादव?

लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपनं 400 पारचा नारा दिला आहे तर, विरोधी इंडिया आघाडी आपल्या विजयाचा दावा करत आहे. या सर्व दाव्यांमध्ये निकालापूर्वीच यादव यांनी इंडिया आघाडी एनडीएपेक्षा जास्त जागा जिंकेल असे सांगत भाजपला 250 पेक्षा कमी जागा मिळतील असे म्हटले आहे.

‘भाजपला बहुमत मिळणार नाही’

‘सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार भाजपला 250 पेक्षा कमी जागा मिळतील असे गणित मांडत शेवटच्या टप्प्यात भाजपला उत्तर प्रदेश आणि बिहारमधून धक्का मिळू शकतो. यामुळे इंडिया आघाडी भाजपला त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. योगेंद्र यादव यांच्या दाव्यानुसार भाजपला 250 किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे 230 पर्यंतही असू शकतो.

काँग्रेस चांगली कामगिरी करेल

भाजपच्या विजयी जागांबद्दल बोलल्यानंतर यादव यांनी काँग्रेस किती जागांवर विजय मिळवेल यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 2019 च्या तुलनेत चांगली कामगिरी करेल आणि साधारण 90 ते 100 जागांवर विजयाचा गुलाल उधळेल असे यादव म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा