Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २८ जून, २०२४

*पोलीस स्टेशनला दाखल केलेली" ॲट्रॉसिटी" ची केस माघार घे म्हणून मारहाण 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

अकलूज पोलीस स्टेशन मध्ये विरोधात दाखल केलेली ॲट्रॉसिटी ची केस मागे घे म्हणून एकाच्या सांगण्यावरून 12 जणांनी मारहाण केल्याप्रकरणी अकलूज पोलिसात 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पोलीस सूचना करून मिळालेली माहिती अशी की

 फिर्यादी विजय रामचंद्र नेटके रा. कोंडबावी ता. माळशिरस यांनी अकलाई हाॅस्पीटल अकलुज येथे उपचार चालू असताना, दिनांक 11/06/2024 रोजी ग्रामसभेमध्ये कोंडबावी येथे झालेल्या भांडणात ऐकमेकांविरुध्द अकलुज पोलीस ठाणेस गुन्हे नोंद झाले होते. फिर्यादीस, तु दिलेली केस मागे घे म्हणून विष्णू घाडगे, रमन माने, अनिल माने, आप्पा घाडगे हे लोक दबाव टाकत होते. 

दिनांक 26/06/2024 रोजी रात्री 10.30 वा चे सुमारास जेवण करून झोपण्यासाठी गोटयासमोर लोखंडी कॉट टाकून झोपले असता रात्रीचे 12.30 वा चे सुमारास पत्राशेडवर दगड टाकून त्यांचेजवळ अचानक 4 ते 5 लोक येवून कॉटवरून उचलून बाजूला घेतले तेव्हा रस्त्यावरील लाईटचे उजेडात पाहिले असता त्यांचे गावातील १) आप्पा घाडगे २) सागर घाडगे, ३) प्रमोद माने ६) विश्वजीत घाडगे, 5) सुनिल आप्पा घाडगे, 6) दादा मधूकर घाडगे, ७) सुनिल फंची माने, १ माने, 8) सुरेश साहेबराव माने, 9) धनाजी भिवाजी शिंदे, 10) सूरज घाडगे, 11) अनिल फंची माने, 12) मिलींद रेडेकर सर्व रा. सर्व रा. कोडबावी ता माळशिरस हे आले व आप्पा घाडगे याने, मांगट्या तू आमचे विरुद्ध केलेली ॲट्रॉसिटी ची केस मागे घे असे म्हणुन जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करुन चाकूचा धाक दाखवून हाताने, लाथाबुक्याने, काठीने मारहाण करुन जखमी केले व सदरची मारहाण ही गावातील विष्णू सदाशिव घाडगे याचे सांगणेवरुन केली आहे वगैरे मजकुरची तक्रार दवाखाना एन्ट्री अंमलदार अमोल पोलीस हवालदार बकाल यांचेकडे दिलेवरुन सदर लोकांविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, नारायण शिरगावकर हे करीत आहेत. 



पोलीस निरीक्षक,

अकलुज पोलीस ठाणे







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा