Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २८ जून, २०२४

*श्री संत तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी माळशिरस तालुका आरोग्य विभाग सज्ज*

 


*अकलुज ---प्रतिनिधी*

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी

श्री संत तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह अनेक छोठ्या मोठ्या पालख्या माळशिरस तालुक्यातून पंढरपुरकडे जात असतात.या पार्श्वभुमीवर आरोग्याच्या दृष्टीने माळशिरस तालुका आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती नुतन तालुका आरोग्य अधिकारी प्रियांका शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

          माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ते टप्पा असे ८० किलो मिटरचे अंतर श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला पार करावे लागते.संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अकलूज ते टप्पा असा सुमारे ३० किमीचे अंतर पार करतो.या दोन्ही पालखी सोहळ्यामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक आलेले असतात.त्याचबरोबर अनेक छोट्या पालख्याही तालुक्यातून जात असतात.या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी माळशिरस तालुक्यातील उपजिल्हा,ग्रामिण रुग्णालय व १२ प्राथमिक रुग्णालये सञ्ज आहेत.३४ आरोग्य बुथची निर्मिती करण्यात आली आहे. पालखी मुक्कामस्थळी १०८ क्रमांकाच्या ४ ॲम्बुलन्ससहीत १६ ॲम्बुलन्स तयार ठेवण्यात आल्या आहेत.१७ वैद्यकीय अधिकारी,प्रतिनियुक्तीवरील १० डॉक्टर,२३ आरोग्य सहाय्यक, उपलब्ध असलेले ४८ आरोग्य सेवक व मागणी केलेले १२० आरोग्य सेवक वारकऱ्यांना सेवा पुरवणार आहेत.असे सुमारे ७९८ अधिकारी वारी काळात तत्पर राहणार आहेत.६ वॉकीटॉकी सेटवरून संदेश देवाणघेवाण करण्यात येणार आहे.३७ आरोग्य दुत दोन चाकी गाड्यांवरून फिरते राहणार आहेत.

            पालखी मार्गावरील पाणी स्त्रोतांची तपासणी करण्यात आलीय.वारी काळात डेंगु, मलेरीया सारखे आजार टाळण्यासाठी कंटेनर सर्व्हे सर्वत्र सुरू आहे.त्याचबरोबर मार्गा वरील सर्व हॉटेल्सच्या स्वयंपाक गृहाची,वेटर,स्वयंपाक्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.१०० फर्स्ट एड किट उपलब्ध करण्यात आले आहेत. सुमारे १५३ दवाखान्यांमधील १० टक्के आयसीयु बेड आरक्षीत करून ठेवण्यात आलेत.सर्पदंश, श्वान दंशच्या लस उपलब्ध ठेवण्यात आल्यात.प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ओआरएसची पाकिटे उपलब्ध ठेवण्यात आलीत.पालखी निघुन गेल्यानंतर व्हायरल आजार व डायरीयाचे आजार मोठ्या प्रमाणावर पसरतो.त्यासाठी आरोग्य प्रशासनाने पुर्ण तयारी केली असल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी प्रियांका शिंदे यांनी दिली.


*चौकट*

*कडक धोरण राबवणार....* 

वारीच्या काळात बोगस डॉक्टर, वैद्य,झाडपाला,जडीबुटी विकणाऱ्यांचा सुळसुळाट असतो. त्यांच्या औषधांमुळे भाविकांच्या आरोग्याला धोका उ‌द्भवू शकतो. अशा सर्व प्रकारच्या बोगस डॉक्टरांवर वारी काळात आमचे लक्ष राहणार आहे.अशा बोगस डॉक्टर,वैद्य व जडीबुटी विकणाऱ्यांवर आरोग्य यंत्रणा कडक कारवाई करणार आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा