*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ निधी तात्काळ न मिळाल्यास मंगळवार दि 18 जुन 2024 रोजी सकाळी 11 वाजता प्रांत कार्यालयावर थाळी नाद आंदोलन करण्यात येईल. असा इशारा माळशिरस तालुका युवासेना (शिवसेना )उधूदव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने निवेदनाद्वारे , प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अकलूज यांना देण्यात आला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की माळशिरस तालुका हा दुष्काळ ग्रस्त जाहीर होऊन गेली सहा महिने झाले आहेत परंतु तालुक्यात दुष्काळ जाहीर करून रडक्याचे डोळे पुसण्याचा प्रकार हा महाराष्ट्र शासनाने केला माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचे दुष्काळ निधीचे कोट्या वधी रुपये शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. उन्हाळा संपून पावसाळा चालू झाला आता तरी महाराष्ट्र शासनाने तात्काळ दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या खातेवर जमा करावा जेणे करून त्या निधीतून शेतकरी बि बियाणे तरी खरेदी करू शकेल. जगाचा पोशिंदा शेतकरी राजा ला महाराष्ट्र शासनाने वाऱ्यावर सोडलेले आहे. जर दुष्काळ निधी तात्काळ जमा न केल्यास मंगळवार दि 18 जुन 2024 रोजी सकाळी 11 वाजता अकलुज येथील प्रांताधिकारी तथा उपविभागीय आधिकारी अकलुज कार्यालयावर थाळी नाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
हे निवेदन अकलुज उपविभागीय कार्यालयातील
महसूल सहाय्यक उपविभागीय अधिकारी कार्यालय माळशिरस विभाग, अकलूज यांनी स्विकारले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा