*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
माढा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही रस्ता चांगल्या दर्जाचा नाही, प्रत्येक रस्त्याच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संजय माळी हे टक्केवारी घेऊन ठेकेदाराना काम देतात, त्यामुळे कामाचा दर्जा अत्यंत खराब आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्याआधी अत्यंत तातडीने अभियंता संजय माळी यांनी पैसे गोळा करत ठेकेदाराना कामे वाटप केली आहे, त्या कामाची सुरवात आत्ता होणार आहे, कामाचे बिल काढणे, कामे करणे, या अधिकाऱ्यांचा प्रमुख हे संजय माळीच आहेत, म्हणून परत एकदा शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधी वाया जाणार आहे. सर्व सामान्य जनतेच्या टॅक्स, मधून जमा होणारा शासन निधी भ्रष्टाचारी संजय माळी यांच्या हाताने वाटप असल्यामुळे ठेकेदाराना हव्या असल्या पद्धतीचे कामे हे चांगल्या पद्धतीचे दखावून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून तो पैसा आपल्या गावाला घेऊन जाणार आहे. तरी संजय माळी यांना त्वरित बडतर्फ करून त्या ठिकाणी नवीन अधिकारीची नेमणूक करून संजय माळी यांची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करावी आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी कारण,
१. ई-निविदा S.No. ५६-२०२३-२
२. ई-निविदा S.No. ५८-२०२३-२
३. ई-निविदा S.No. ५९-२०२३-२
या कामामध्ये कोणत्याही ठेकेदाराची ऑनलाइन बीड कॅपॅसिटी चेक न करता अ. अभियंता संजय माळी यांनी कामे वाटण्याचे आणि पैसा गोळा करण्याचे काम केले आहे तरी संजय माळी यांच्यावर कारवाई झाली नाही तर दि.१४ जून २०२४ रोजी तोंडाला काळ्या पट्टा बांधून माढा तालुक्यातील शेतकरी व शेकडो विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालय, पुनम गेट, सोलापूर येथे आंदोलन करतील असा इशारा त्यांनी एका निवेदनाद्वारे दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा