*अकलूज ----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अकलूज शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळाच्या वतीने शहरातून भव्य मिरवणुक काढण्यात आली होती.यामध्ये पुण्यातील झांज पथक व फलटणचे धनगरी वेशातील गजीढोल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती शुक्रवारी माळशिरस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती,संस्था,शिक्षण संस्थेमध्ये अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळाच्या वतीने जुन्या पोलिस ठाण्या शेजारी मंडप टाकण्यात आला होता.सायंकाळी सातच्या सुमारास मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.पुण्याहून आलेले महिला व पुरुष झांज व ढोल पथक,त्यामागे हलगी पथक व त्यामागे फलटणहुन आलेले धनगरी वेशातील गजी ढोल पथक होते.त्यापाठीमागे असलेले हलगी मंडळ होते.हि मिरवणूक बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
*सर्वांना ठेका धरायला लावणारी मिरवणूक.*
पुण्यातील झांज ढोल पथकात असणारे मुले व मुलींच्या तालावर सगळे माना डोलवत होते. सजवलेल्या रथामध्ये व आकर्षक केलेल्या विद्युत रोषणाई केलेल्या रथात अहिल्यादेवींची प्रतिमा लक्ष वेधून घेत होती.आज संपूर्ण शहरात पिवळे ध्वज लावले होते तर बहुतेक कार्यकत्यांनी पिवळ्या रंगाची वेशभूषा केली होती.या सर्वांवर भंडाऱ्याची मुक्त उधळण होत होती.हि मिरवणूक जुने पोलीस ठाणे ते जुने बस स्थानक मार्गे सदूभाऊ चौक,गांधी चौक ते पुन्हा जुने पोली पोलीस स्टेशन मार्गे मिरवणूक काढण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा