*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
समाजवादी पक्षाचे खासदार आरके चौधरी यांनी २५ जून रोजी हंगामी लोकसभाध्यक्ष भर्तृहरी महताब यांना पत्र लिहून संसदेत त्यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ते म्हणाले, “आज मी या सन्माननीय सभागृहात शपथ घेतली की, कायद्याने स्थापित केलेल्या भारतीय संविधानावर मी खरा विश्वास आणि निष्ठा ठेवीन. पण खुर्चीच्या उजव्या बाजूला ‘सेंगोल’ पाहून मला धक्काच बसला. संविधान हा एक पवित्र दस्तऐवज आहे आणि भारताच्या लोकशाहीचे प्रतीक आहे तर ‘सेंगोल’ हे राजेशाहीचे प्रतीक आहे.’
‘आपल्या मागील कार्यकाळात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने संसदेत ‘सेंगोल’ बसवले. ‘सेंगोल’ म्हणजे ‘राज-दंड.’ याचा अर्थ ‘राजा का दंड’ असाही होतो. राजेशाही संपवून देश स्वतंत्र झाला. देश ‘राजाचा दंडा’ने चालेल की संविधानाने? आपली संसद हे लोकशाहीचे मंदिर आहे, काही राजाचा वा राजवाडा नाही. माझी मागणी आहे की, ‘सेंगोल’ संसदेतून काढून टाकण्यात यावे आणि त्याजागी संविधानाची मोठी प्रतिकृती बसवावी.’
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्याचे समर्थन केले आणि दावा केला, ‘जेव्हा सेंगोल स्थापित केले गेले, तेव्हा पंतप्रधानांनी त्यास नतमस्तक केले होते, परंतु यावेळी शपथ घेताना ते नतमस्तक होणे विसरले. मला वाटते की, आमच्या खासदाराला त्याची आठवण करून द्यायची होती.’ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार बी. मणिकम टागोर यांनी हीच भावना व्यक्त केली.
‘आम्ही अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की सेंगोल हे राजेशाहीचे प्रतीक आहे आणि राज्य-युग संपले आहे. आपण लोकांची लोकशाही आणि संविधान साजरे केले पाहिजे. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार आणि लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती यांनीही जाहीर केले की, ज्याने ही मागणी केली आहे, मी त्यांचे स्वागत करते. राजदचे राज्यसभेचे खासदार मनोज झा हेदेखील या सुरात सामील झाले. ‘आम्ही याला विरोध केला होता आणि संसदेत ‘सेंगोल’ हे राजेशाहीचे प्रतीक असल्याचे सांगितले होते.
आपल्या पंतप्रधानांची वर्तणूक राजासारखी आहे,’ असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी दागिने, कपडे, मंगळसूत्र आणि मुजरा यांसह इतर मुद्दे मांडले जे पंतप्रधानांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान विरोधकांना उघड करण्यासाठी वापरले होते. तेव्हा खासदार पुढे म्हणाले, ‘आता देशात केवळ याच विषयांवर चर्चा होईल. देश चालवणाऱ्या राज्यघटनेची एक मोठी प्रतिकृती तिथे लावणे चांगले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा