*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अकलुज रोटरी क्लब ऑफ अकलुजच्या अध्यक्षपदी प्रिया नवनाथ नागणे तर सेक्रेटरीपदी मनिष गायकवाड यांची निवड झाली. रोटरी क्लब ऑफ अकलुजच्या २०२४-२०२५ साठी नुतन अध्यक्षा व सेक्रेटरी यांचा पदग्रहण सोहळा प्रांतपाल स्वाती हेरकल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.मावळते अध्यक्ष तेजस दोभाडा यांनी नुतन अध्यक्षा प्रिया नागणेना पदभार दिला तर मावळते सेक्रेटरी कल्पेश पांढरे यांनी नुतन सेक्रेटरी मनिष गायकवाड पदभार सुपुर्द केला.
याप्रसंगी जयेश पटेल,अतुल चव्हाण, प्रमोद शेंडे,विशाल बेले, धनश्री केळकर,उत्तमराव माने, आक्काताई माने,मनोरमा लावंड, तृप्ती कुदळे,वनिता कोरटकर, नवनाथ नागणे,नितीन कुदळे, आशिष गांधी केतन बोरावके, बबनराव शेंडगे,राजीव बनकर, शशिल गांधी, दीपक फडे,संदिप लोणकर,प्रविण कारंडे,धनंजय देशमुख,अजीत वीर आदीसह क्लबचे नुतन पदाधिकारी,सर्व उपस्थित होते.यावेळी ५२७ शालेय विद्यार्थ्यींनींना सायकल व ३ अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दळण मशीन वाटपा बरोबरच महिला आरोग्य विषयक तपासणी व मार्गदर्शन करणा-या फिरत्या वाहिकेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी क्लबसाठी योगदान देणारे नितीन कुदळे, अजीत विर,नवनाथ नागणे,केतन बोरावके,दिपक फडे,शशिल गांधी,आशिष गांधी यांना स्मृती चिन्ह देवुन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रविण कारंडे यांनी केले तर आभार नुतन सेक्रेटरी मनिष गायकवाड यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा