Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १७ जून, २०२४

*मराठा व्यवसायिक संघटनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात ..ॲड- नितीन खराडे*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

कुटुंबातला कर्ता पुरुष गेला तर अनेक कुटुंब अडचणीत येतात याची जाणीव ठेवून मराठा व्यावसायिक संघटना शालेय मुलांच्या शिक्षणासाठी नेहमीच मदतीचा हात पुढे करते असे प्रतिपादन मराठा व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष अँड.नितीन खराडे यांनी केले.



    ते कोरोना काळात किंवा इतर कारणांनी पालकत्वाचे छत्र हरवलेल्या मुलांसाठी संघाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ दत्तक पालक योजनेअंतर्गत मुलांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते.

    यावेळी संघाचे जेष्ठ संचालक डॉ.राजीव राणे,माजी अध्यक्ष नवनाथ सावंत, उपाध्यक्ष विशाल गोरे,आनंद चव्हाण, अनिल कदम

आदी उपस्थित होते.

     यावेळी पालकत्व हरविलेल्या ३९मुलांना शालेय बँग त्याचबरोबर गणवेश,शूज,वह्या, पुस्तके,परीक्षा फी यासाठी आर्थिक मदत करण्यात आली.



 कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विठ्ठल गायकवाड, गणेश महाडिक,इंद्रजीत नलवडे,विक्रांत माने देशमुख,योगेश देशमुख,रामचंद्र चव्हाण,कुंडलिक गायकवाड आदींनी परीश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे सचिव प्रा.धनंजय देशमुख तर आभार जगदीश कदम यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा