Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ५ जून, २०२४

अकलूजच्या शिवरत्न पॅटर्नच्या नीट परीक्षेत विद्यार्थ्यांचे सुयश.

 


*उपसंपादक---नुरजहाँ शेख*

  *टाइम्स 45 न्युज मराठी

अकलूज येथील शिवरत्न शिक्षण संस्थेच्या शिवरत्न पॅटर्नच्या २५ विद्यार्थ्यांनी देश पातळीवर घेण्यात आलेल्या नीट परीक्षा २०२४ दिली.त्यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.१) श्रेयस शैलेश पवार (६३३/७२०) केमिस्ट्रीमध्ये (१८०/१८०), २) प्रियांशु पंढरीनाथ माने (४२३/७२०), ३) कु.साक्षी बापू मोरे (४१८/७२०), ४)सिद्धराज सतीश देवकर (३८६/७२०), ५) कु.निधी कल्पेश गांधी (३५५/७२०),६) कु.सायली सुभाष कटके (३५३/७२०), ७) निरज निलेश फडे (३१६/७२०) या विद्यार्थ्यांनी नेट परीक्षा २०२४ च्या परीक्षेत यश संपादन केले आहे. 



      ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी अकलूज येथे लातूर पॅटर्नवर आधारित अकलूज येथे शिवरत्न पॅटर्नची सुरूवात केलेली आहे.या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी या परीक्षेत यश संपादन करीत आहेत ही गोष्ट संस्थेसाठी अतिशय अभिमानास्पद आहे.त्यासाठी अकलूज येथील शिवरत्न शिक्षण संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात असतात.असे धैर्यशील मोहिते पाटील व सौ.शितलदेवी मोहिते पाटील यांनी सांगितले.


       हे विद्यार्थी देशातील नामवंत अशा प्रतिष्ठित इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळण्यास पात्र झालेले आहेत.संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील व अध्यक्ष सौ.शितलदेवी मोहिते पाटील,सचिव धर्मराज दगडे, प्रिन्सिपल डायरेक्टर प्रा.डाॅ. विश्वनाथ आवड यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे व शिवरत्न शिक्षण संस्थेचे सर्व संचालक,व्यवस्थापन समिती सदस्य,प्राचार्य, समन्वयक,सर्व विभागप्रमुख, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा