Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १५ जून, २०२४

"*प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर "यांच्या आदर्श शिकवणीनुसार असणारी प्रथा म्हणजे-" बकरी ईद"*


 

*इक्बाल बाबासाहेब मुल्ला--(पञकार)*

*सांगली

बकरे "कापताना" त्या बकर्याला त्रास होतो का ??? मनुष्य असो वा जनावर , प्रत्येकात रक्त असते ,पण दुकानातून मटण घेताना अथवा कुर्बानी चे बकरे "कापल्यानंतर" त्याच्या अवयवात "रक्त" का दिसत नाही ???

 संपूर्ण जगात बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या कडून होत असलेल्या बकरे कापण्याच्या पद्धतीला सर्वमान्यता का आहे ? याबद्दल सत्य व शास्त्रीय माहिती वाचकांना देत आहे.

वास्तविक कोणत्याही जनावराला तोंडाखाली 4 नसा असतात. बकऱ्याच्या तोंडाखाली मुख्य नळी असते ,जी चारापाणी यासाठी असते . आणि त्याच्या बाजूला श्वासनलिका* ची नळी असते. आणि त्यांच्या आजूबाजूला दोन मोठ्या "नसा" या रक्तवाहिन्या च्या असतात.



बकरा कापताना, त्याच्या मानेवर सूरी फिरवताना, चारापाणी ची नळी सोबत दोन्ही रक्तवाहिन्या कापली जाते. रक्तवाहिनी ही मेंदूला रक्तपुरवठा" करण्याचे कार्य करत असते . पण जेंव्हा रक्ताची नस कापली जाते तेंव्हा मेंदूला होणारा रक्तपुरवठा तात्काळ थांबतो.

बकरे कापताना जेंव्हा या दोन नळ्या कापल्या जातात तेंव्हा अतिशय "प्रेशर" ने होणारा मेंदूचा पुरवठा तात्काळ थांबवला जातो. आणि मेंदू संवेदनहीन होतो,त्या जनावराला स्वतः आपण "कापले" गेलो आहे याची जाणीवही होत नाही. व त्याला अजिबात "त्रास" होत नाही.

मुस्लिमांच्या जनावर कापण्याच्या पद्धतीमध्ये त्या जनावराच्या मेंदूला वेदना अतिशय कमी होतात . पाश्चिमात्य लोकांनी जेंव्हां याचा शोध घेतला तेंव्हा त्यांना धक्का बसला . कारण त्यांनी विविध प्रकारे जनावरच्या मेंदूला होणारा त्रास मोजला. एका बकर्याला त्यांनी बंदुकीची गोळी घातली तेंव्हा त्या बकऱ्याच्या मेंदूला अतिशय वेदना झाल्या. त्यानंतर एका बकर्याला विजेचा शॉक दिला ,तेंव्हादेखील त्या बकऱ्याच्या मेंदूला अतिशय त्रास झाला.

परंतु इस्लामच्या पद्धतीनुसार जेंव्हा बकऱ्याच्या गळ्यावर जेंव्हा धारदार सुरीने 2-4 सेकंदात त्या बकऱ्याच्या 4 नसा कापल्या तेंव्हा क्षणार्धात ते बकरे त्रासाविना निपचित पडले .  

वास्तविक 4 सेकंदात जेंव्हा बकऱ्याच्या गळा कापला जातो तेंव्हा रक्ताची नळी कापल्यामुळे ,त्याला काही कळेपर्यंत ,त्या बकर्याला संवेदना होत नाही. 

समजा आपल्या हाताला रक्तपुरवठा कमी होतो आणि तो हात "बधिर" झाला ,तर त्याला काही टोचलं तरी "त्रास" होत नाही ,पण जर "सुदृढ" शरीर असेल आणि सुई टोचली की तात्काळ कळ येते, आपण हात तात्काळ बाजूला करतो. अगदी तसाच प्रकार मुस्लिमांच्या या आदर्श पद्धतीनुसार बकऱ्याच्या शरीरातील सर्व रक्त बाहेर फेकले जाते. व संपूर्ण मांस हे शुद्ध आणि खाण्यालायक राहते. 

केवळ इस्लाममध्येचं "प्रेषित मोहम्मद पैगंबर "यांच्या आदर्श शिकवणुनुसार असणारी ही "प्रथा" आहे. आणि त्याचे फायदे जगातील संपूर्ण मानवजातीसाठी आदर्शवत आहेत .बकरी ईद आणि कोणत्याही मटण दुकानात कापण्यात येणाऱ्या बकऱ्याचे हे "सत्य" आहे .


*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध,

संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा