Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १५ जून, २०२४

*संग्रामनगर ता. माळशिरस येथील जयसिंह मोहिते पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा*

 


*अकलुज ----प्रतिनिधी*

*शकूर ---तांबोळी*

*टाइम्स 45 न्युज मराठी

श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर शाळेत दि. १५जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या दिवशी विद्यार्थी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात करण्यात आला. 

       कार्यक्रमाची सुरुवात छोटागट, मोठा गट, पहिली,पाचवीतील नवातांचे स्वागत औक्षण करून, गुलाबपुष्प, चाॅकलेट, पेन-पेन्सील देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मल्हारी घुले सर उपस्थित होते. 



सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील, रत्नप्रभा देवी मोहिते पाटील यांचे प्रतिमापूजन आणि सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.तसेच नववी-दहावीतील विद्यार्थ्यींनींनी हाताची कमान करून टाळ्यांच्या- ढोल ताशांच्या गजरात, वर्गा पुढे रांगोळी काढून नवीन विद्यार्थी स्वागत करण्यात आले. प्रशालेतील शिक्षक सुरेश माने सर यांनी भाषणात सर्वांचे स्वागत केले, मुख्याध्यापक मल्हारी घुले सरांनी विद्यार्थी-पालकांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभाग मुख्याध्यापक गणेश करडे सर यांनी केले तर आभार शिक्षक संतोष कदम यांनी मानले.

     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रशीद मुलाणी, सुरेश माने,संतोष कदम, रवींद्र कवटे,सतिश एकतपुरे, गणेश म्हसवडे, नवनाथ राऊत,सुनील काळे शिक्षिका अनिता सुर्यवंशी,

विजया पेटकर,रोहिणी गायकवाड,आरती दोरकर,शुभांगी कदम, शीला भूमकर यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा