*उपसंपादक----नुरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
संदर्भ : १) सार्वजनिक आरोग्य विभाग दि.२८/०७/2023 शासन निर्णय क्र. महात्मा फुले जन आरोग्य योजना २०२३/ प्र.क्र.१६०/आरोग्य च्या अनुषंगाने या योजनेचा लाभ शुभ्र शिधापञिका धारकांना मिळण्यासाठी आधार कार्ड शिधापञिकेला संलग्न करुन घेण्या बाबत राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्या दि. १६/५/२०२४ च्या पञा नुसार १) राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी २) सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी ३) सर्व उपनियंत्रक कक्ष वाटप मुंबई.- यांना याबाबत आदेश देण्यात आले आहे
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.२६.०२.२०१९ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या घटकांमध्ये दि.२८.०७.२०२३ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.
शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
देण्याकरिता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे
आवश्यक आहे. करिता, शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न (Aadhar Seeded) करण्याची
कार्यवाही करण्यात यावी असेही प्रसिध्दीस दिलेल्या पञकात म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा