*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
आज शिवसेना स्थापन होऊन ५८ वर्ष पुर्ण झाली.५८ वर्षापुर्वी या महाराष्ट्रातल्या दिनदलीत गोरगरीब मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी एक युगपुरूष त्वेषाने पेटून उठला आणि आपल्याच महाराष्ट्रात मराठी माणसावर होणार्या अन्यायावर ज्यांनी आवाज उठविला त्यांच नाव आहे "बाळ केशव ठाकरे".शिवसेना एक संघटना म्हणून उदयाला आली ज्या संघटनेने मुंबईतील खितपत पडलेल्या मराठी माणसाचा स्वाभिमान जागा केला जो स्वाभिमान कित्येक वर्ष मरगळलेल्या अवस्थेत होता.
'वाचा आणि पेटून उठा' या मार्मिक च्या साप्ताहिकाने खर्या अर्थाने मराठी माणूस पेटून उठला आणि त्या मार्मिकच्या चिंगारीने शिवसेना या संघटनेची स्थापना दादरच्या शिवाजी पार्क (शिवतिर्थावर) करण्यात आली.
महाराष्ट्रात अनेक सेना निघाल्या ज्या काही शेकडोंच्या गिनतीत असतीत हजारोंच्या गिनतीत असतील काही संपल्या तर काही मेनबत्यासारख्या विरघळून गेल्या टिकली ती फक्त तुमची आमची जीवाभावाची शिवसेना🚩.
मुंबई ही गुजरातची राजधानी होणार होती ती मुंबई टिकली फक्त शिवसेनेमुळे अन्यथा आज त्या मुंबईवर मोदी अगर एखादा अमित शहा राज्य केलेला दिसला असता.जर बाळासाहेबांनी शिवसेनाच काढली नसती तर गुजरातच्या मोरारजीभाई देसाईने ती मुंबई गुजरातच्या दावनीला केंव्हाच बांधली असती.पण आपला वाघ त्या काळी डरकाळी फोडून उठला आणि मराठी माणसांना उद्देशून म्हणाला "होय मुंबई आपली आहे आपली ,
आणि इथे आवाज आपलाच असायला हवा" तेंव्हा मराठी माणूस खर्या अर्थाने चवताळून उठला आणि मुंबई ही गुजरातला जाता जाता वाचली.
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे या महाराष्ट्रावर अनेक उपकार आहेत जे आपण कधीच फेडू शकत नाही.मी आज जे शिवसेनेसाठी काही लिहीतो बोलतो हे मला काही मिळाव म्हणून कधीच करीत नाही तर शिवसेना आणि हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबांचे उपकार आमच्यावर आहेत म्हणून मी माझ कर्तव्य निष्ठेने करीत असतो.ज्या बाळासाहेबांनी आयुष्यात कोणतही पद उपभोगल नाही सार आयुष्य त्यांनी गोरगरीब शिवसैनिकांना नगरसेवक,आमदार,खासदार,मंत्री बनविण्यात घालविल पण स्वत:साठी बाळासाहेब कधीच काही घेऊ शकले नाहीत अशा निस्वार्थी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून मी माझ आयुष्य शिवसेनेसाठी अर्पण केलेल आहे.
५८ वर्ष झाली शिवसेना स्थापन होऊन पण आजही शिवसेनेचा तोच रूतबा कायम आहे तीच दहशत कायम आहे.शिवसेना ही नेत्यांच्या जीवावर कधीच नव्हती जी कालही नव्हती ना आजही नाही.शिवसेना ही सामान्य शिवसैनिकांच्या असामान्य ताकदीवर उभी आहे जी ताकद स्वत:ला बलाढ्य समजणार्या भाजपमधे नाही ना जगातल्या कुठल्याही राजकीय पक्षात नाही ती फक्त शिवसेनेत आहे.बाळासाहेबांनंतर उद्धवसाहेब ठाकरे व आदित्य साहेब ठाकरे हेच तमाम शिवसैनिकांचे सर्वेसर्वा आहेत त्यांच्या आदेशाच पालन करणे हे आमच कर्तव्य आहे ते आम्ही मरेपर्यंत पालन करू...!
दिल्लीत सत्ता आहे म्हणून काही कुत्र्यांनी आमच्या शिवसेनेचे लचके तोडले आमच्या शिवसेनेला जखमी केले असले तरी त्या कुत्र्यांना सांगू इच्छीतो वाघ जखमी झाला म्हणून कधी गवत खात नाही तो शिकार करूनच खातो हे लक्षात ठेवा आणि प्रत्येक लांडग्याची शिकार कशी करायची हे वाघाला सांगायची गरज लागत नाही.सावज टप्यात आला की कार्यक्रम झाला म्हणून समजा.
काही लोकांनी नकली शिवसेना निर्माण केली आमचा बाण चोरला अशा भुरट्यांना आम्ही फाट्यावर मारतो.दिल्लीत बसलेल्या तुमच्या बापाच्या जीवावर तुम्ही आज उड्या मारीत आहात ज्यावेळेस तुमचा बाप राजकारणात खलास होईल त्यावेळेस तुम्हाला कोण वाचविणार ??? काही दिवस कुत्र्यांचेही असतात आज महाराष्ट्रात कुत्री थयाथया नाचत आहेत उद्या निवडणूकीत यांची शिकार होणार हे निश्चित आहे.
शिवसेना ही एकच आहे ती म्हणजे आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे..
आम्ही हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबांचे अनुयायी आहोत त्यांचे निस्सिम भक्त आहोत जो पर्यंत आम्ही जीवंत आहोत तोपर्यंत या शिवसेनेला कोणी हलवू शकणार नाही ना संपवू शकणार नाही.दिल्लीत बसलेल्या कुत्र्यांनो इडी,सीबीआय,आमच्या शिवसेनेच काही वाकड करू शकत नाही तुमचा बाप जो गादीवर बसलेला आहे तो ही काही करू शकत नाही..एकट्या उद्धवसाहेब ठाकरे यांना संपवायला तुम्हाला तुमची कायनात रस्त्यावर आणावी लागली मुंबईच्या रस्त्यावर मताची भीक मागावी लागली रोड शो करावा लागला पण बाप हा बाप असतो बेटा हा बेटा असतो..!!
मुंबई का कींग कोण ! असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्या प्रश्नाच एकच उत्तर असेल..
शिवसेना शिवसेना फक्त शिवसेना
जय महाराष्ट्र
*अतुल श्रावण भवर,सोलापूर*
*मो नं ९९६००९०००१*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा