*अकलुज ----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील संग्रामनगर परिसरात विविध झाडांची रोपे लावून माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी वटपौर्णिमा सण मोठा उत्साहात साजरा करण्यात आला.या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड,अकलूज सोलापूर पंढरपूर विभाग यांच्या वतीने आज वटपौर्णिमेचे औचित्य साधून जिजाऊ ब्रिगेड अकलूज यांनी पारंपारिक पद्धतीने वडाचे झाडाची पूजा न करता विविध प्रकारचे झाडे लावून जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी वटपौर्णिमा सण साजरा केला.सध्या सर्वत्र रस्ता रूंदीकरणामुळे मोठ मोठ्या वृक्षांची तोड होत असल्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे.हे लक्षात घेऊन जिजाऊ ब्रिगेडच्या माळशिरस तालुका अध्यक्ष शिवमती मनोरमा लावंड मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली संग्रामनगर येथे झाडे लावून त्यांची सावली सर्वांना मिळावी अशी रोपे लावण्यात आली आहेत.
यावेळी माळशिरस तालुका अध्यक्ष शिवमती मनोरमा लावंड शहराध्यक्ष शुभांगी क्षीरसागर,कार्याध्यक्ष शारदा चव्हाण संघटक सुवर्णा घोरपडे संघटक आशा सावंत, संघटक वंदना पवार,स्नेहल घाडगे,सुवर्णा जगदाळे,,शकुंतला घार्गे,भाग्यश्री लोहकरे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा