*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अकलूज येथील नवीन एसटी स्टँड च्या पाठीमागील बायपास रोडवर गायकवाड हॉस्पिटल समोर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहे
या याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या वृत्तानुसार रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान एसटी स्टँड जवळील महर्षी चौक ते माळशिरस रोडवरील जयसिंह चौक दरम्यान असलेल्या गायकवाड हॉस्पिटल समोर भीषण अपघात झाला असून हा अपघात एवढा भीषण होता की या वाहन क्र.MH-45-N-0008 हि टोरानो गाडी (निसान कंपनी)मध्ये चार जण प्रवास करत होते शिवाय गाडी भरघाव वेगाने असल्याने त्याच्या वरील ताबा सुटून ही गाडी गायकवाड हाॕस्पिटल जवळ असलेल्या एका झाडाला जोरात धडकल्याने पाठीमागे बसलेल्या एका युवकाचे शीर धडावेगळे झाला तर मेंदू दूरवर उडून पडलेला दिसत असुन दोघांचा मृत्यू झाला आहे वाहन चालवणाऱ्या चालकाशेजारी दुसरा एक जण व्यक्ती बसला होता ते दोघेही गंभीर जखमी झाल्याने अकलूज येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू असून अपघातग्रस्त गाडीवरील दोन्ही मयत व जखमी झालेले असे चौघेजण उघडेवाडी वेळापूर येथील असल्याचे वृत्त आहे याबाबत दोन्ही मृत्यु झालेल्यावर अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टम केल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत पोलिसांकडून अधिक तपास चालू असून अद्याप पोलिसांकडे याची नोंद झाली नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा