*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मुंबई - 06 जून :* छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी पराभव केला. आपल्या पराभवाला पक्षातील काही लोकच जबाबदार असून, त्यात अंबादास दानवे यांची मोठी भूमिका असल्याचा आरोप खैरे यांनी केला. यासंदर्भात पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे लिखित तक्रार केल्याची माहिती त्यांनी बुधवारी दिली.
या ठिकाणी ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांना तिकीट मिळेल अशी आशा होती. परंतु, त्यांना तिकीट न देता पक्षाने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिले. त्यामुळे दोन्ही नेत्यातील वाद मातोश्रीपर्यंत पोहोचला होता. आता पुन्हा पराभवानंतर खैरे यांनी दानवे यांनाच पराभवासाठी जबाबदार धरले आहे. त्यांनी प्रचारात सहभाग न घेता विरोधी पक्षाला मदत केली, असा आरोप खैरे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीवेळी धोका होऊ नये यासाठी आपण पक्ष प्रमुखांना भेटून तक्रार दिल्याचे ते म्हणाले.
खैरे पुढे म्हणाले, पराभव मनाला लागणारा आहे. आपण कधी भ्रष्टाचार केला नाही. निर्व्यसनी, प्रामाणिक माणसाला नागरिकांनी मत दिली नसल्याने आपण दुःखी झालो आहोत. भुमरे यांनी 80 कोटी रुपये वाटले. हा धनशक्तीचा विजय आहे. माझ्या पक्षातील काहींनी काम केले नाही असा संशय आहे. मी एकटा पडलो, ते फक्त यायचे अन् बसायचे. या वेळेस अंबादास दानवे यांनी काम करायला हवे होते, त्यांनी फक्त दिखावा केला काम मात्र काहीच केले नाही असा आरोप खैरे यांनी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा