*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
कोल्हापूर :---किल्ले विशाळगड येथे आंदोलन करण्यास परवानगी नसतानाही काही लोकांनी तेथे जाऊन हिंसा केली. या घटनेचे पाहणी करण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही इंडिया इंडिया च्या वतीने उद्या विशाळगडवर जाणार आहोत. आम्हाला कोणीही अडवू नये, अशी भूमिका काँग्रेसचे विधान परिषदेतील गट नेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
विशाळगड अतिक्रमण प्रकरणाला हिंसक वळण लागल्याच्या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीची येथे बैठक झाली. खासदार शाहू छत्रपती , शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वही. बी. पाटील यांच्यासह आघाडी इंडिया आघाडीच्या प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी विशाळगड प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप करून जिल्हा पोलीस प्रमुख यांचे बदली करावी अशी मागणी केली. विशाळगडवर झालेला हिंसाचार म्हणजे प्रशासनाचे अपयश आहे , असं सांगत संभाजीराजेंनीही यावर भूमिका घेताना थोडा विचार करायला हवा होता, अशी प्रतिक्रिय सतेज पाटील यांनी दिली आहे. संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा का होऊ दिली जात नाही, हे सर्व घडायचं शासन वाट पाहत होतं का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा