*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
फोन का करतोस म्हणून एकास लाकडी बॅट लाकडी काठी आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे याबाबत अकलूज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 22/07/2024 रोजी रात्री 11.00 वा. चे सुमारास निमगांवपाटी, विझोरी येथे भांडण झाले असल्याची माहिती अकलुज पोलीसांना मिळाल्याने अकलुज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, रात्रगस्तीचे पोलीस उपनिरीक्षक बबन साळुंके, स.पो.नि. चैधरी, पोलीस अंमलदार गोरे, निकम, तांबोळी, स्वरुप षिंदे, नागरगोजे, महिला चालक हावळे असे घटनास्थळी रवाना झाले. जखमी असलेले शंकर यल्लाप्पा पवार तसेच अंबादास रामा जाधव यांना उपचाराकरीता अकलुज उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे नातेवाईकां सोबत पाठविले असता वैदयकिय अधिकारी यांनी जखमी अंबादास जाधव हा मयत झाला असल्याचे सांगितले. उपचार चालू असणारे जखमी शंकर यल्लाप्पा पवार रा. मोरोची ता. माळषिरस यांनी उपचार दरम्यान दवाखाना एन्ट्री अंमलदार मिगरणे यांचेकडे जबाब दिला की, ते व त्याचा मित्र अर्जुन भाऊसाहेब पवार रा. मोरोची तसेच फिर्यादीचा चुलत भाचा अंबादास रामा जाधव रा. मोरोची असे अर्जुन पवार याचे नातेवाईकाची एच. एफ. डीलक्स डभ्45।ै1989 या गाडीवरून ट्रिपल सीट वेळापूर येथील नातेवाईकांचा देव देवांचा कार्यक्रम करुन परत मोरोचीकडे जात असताना रात्री 9.45 वा. चे सुमारास निमगांव पाटी विझोरी येथे दगडाचे ढिगा-याजवळ लघवी करीता थांबले तेव्हा आरोपी 1) रामराज अशोक वाघमोडे, 2) रामचंद्र व्यंकू वाघमोडे, 3) सिध्दनाथ रामचंद्र वाघमोडे, 4) बापुराव व्यंकू वाघमोडे सर्व रा. पाण्याचे टाकीजवळ निमगांव पाटी, विझोरी ता. माळषिरस या सर्वांनी मिळून तेथे येवून शंकर पवार यास, सोनालीला फोन का करतो असे म्हणून तुम्हास एका एकाला खल्लास करतो असे म्हणून लाकडी बॅट, लाकडी काठीने लाथाबुक्क्यांनी अंबादास रामा जाधव यास मारहाण करुन जिवेठार मारले तसेच फिर्यादी, अर्जुन पवार तसेच सोनाली वाघमोडे हिलाही मारहाण करून जखमी केले आहे म्हणून षंकर यल्लाप्पा पवार रा. मोरोची यांनी तक्रार दिल्याने पोलीस उपनिरीक्षक बबन साळुंके यांनी गुन्हा रजिस्टर नंबर 382/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) प्रमाणे दिनांक 23/07/2024 रोजी गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, नारायण शिरगांवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, अकलुज पोलीस ठाणे हे करीत आहेत. सदर गुन्हयातील आरोपी रामराज अशोक वाघमोडे यास अटक करण्यात आली असून दिनांक 26/07/2024 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे.
पोलीस निरीक्षक,
अकलूज पोलीस ठाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा