संविधान लिहून शिल्पकार जगी शोभले
भारत भूमीवर भीमराव अवतरले॥धृ॥
थोर प्रकांड पंडित महामानवास वंदन
दीन दलित असपृश्यांचे फुलवले नंदन
गोरगरीबांना न्याय मिळवण्यास लढले
भारत भूमीवर भीमराव अवतरले॥१॥
एकात्मता धर्मनिरपेक्षता दिले वरदान
इतिहासात घटणाकार म्हणुन आहे मान
संघर्ष जिद्द ,धीर, चिकाटीने शिक्षण घेतले
भारत भूमीवर भीमराव अवतरले॥२॥
शिका संघटीत व्हा संघर्ष कराचा नारा दिला
तळा गळातील जनतेचा अंधकार मिटवला
बौध्द धम्म स्विकारून दु:खितांच्या दु:खाला जागले
भारत भूमीवर भीमराव अवतरले॥३॥
प्रखर ज्ञानाच्या तेजाने विश्व टाकले व्यापून
अशिक्षितांना शिक्षणाचा मार्ग दिला दाखवून
महिलांच्या उध्दारासाठी सतत ते झटले
भारत भूमीवर भीमराव अवतरले॥४॥
अनिसा सिकंदर शेख
ता.दौंड जि.पुणे
९२७००५५६६६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा