*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
समाजामध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता नष्ट व्हावी त्याचबरोबर अत्यंत पवित्र असा हा पालखी सोहळा स्वच्छ,सुंदर आणि निरोगी रहावा यासाठी वारकऱ्यांनी समाजामध्ये व्यसनमुक्तीचे प्रबोधन करावे असे मत व्यसनमुक्त युवक संघाचे प्रा धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले. ते वेळापूर येथे माऊलींच्या पालखी स्वागताच्या वेळी व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून प्रबोधन करताना बोलत होते.
वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून नामसाधनेसोबतच व्यसनमुक्तीचे दुष्परिणाम लोकांमध्ये पोहचावे यासाठी मागील २०वर्षापासून जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये हे प्रबोधनाचे कार्य चालू आहे.असे मत संघाचे राज्य अध्यक्ष दिपक जाधव यांनी केले.
व्यसनमुक्ती ची वारी -पांडुरंगाच्या दारी,आता घुमवुया एकच नारा-व्यसनमुक्त करुया महाराष्ट्र सारा, गुटखा-मावा कधी न खावा वाटते का तुम्हाला रोग व्हावा,गंदे लोग गंदी पसंत-माणिकचंद... माणिकचंद....,नका खावू तंबाखू नका लावू चुना हा माणसाचा जन्म नाही पुन्हा पुन्हा अशा प्रकारचे प्रबोधन पर संदेश,कविता,भारुड, पथनाट्य आणि तुकोबारायांच्या अभंगाच्या माध्यमातून आळंदीपासून व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते वारकऱ्यांना देत आहेत.पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी व्यसनाचे दुष्परिणाम दाखवणारे डिजिटल फलक,माहितीपत्रक, चलचित्र, प्रबोधिका व व्यसनांमुळे तोंडाची होणारी विद्रुपता दाखवणारे विविध मुखवटे घालून याद्वारे व्यसनांची गंभीरता दाखवण्यात येते. येणाऱ्या सर्व वारकऱ्यांमध्ये रामकृष्णहरि म्हणत मिसळून त्यांना व्यसनांचे दुष्परिणाम पटवून दिले जात आहेत त्यामुळे अनेक पालखी सोहळ्यातील वारकरी माऊलींच्या साक्षीने व्यसन सोडण्याचा शपथ घेत आहेत. मागील अनेक वर्षापासून ज्यांनी या सोहळ्यामध्ये व्यसन सोडले आहे असे अनेक लोक या ठिकाणी येऊन येणाऱ्या भाविकांना आम्ही कसे व्यसनमुक्त झालो याचेही प्रबोधन करतात.
या उपक्रमाचे आळंदी संस्थानसह अनेक दिंडी प्रमुख, वारकरी आणि विशेष करून महिलांनी कौतुक केले आहे.
आळंदीपासून संघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विजय पराडे,सुरेश मगर, राजेंद्र घाडगे,तुकाराम कुंभार, रवी मुजुमले, प्रमोद भापकर,विश्वनाथ गोळे, आझादी बचाव अंदोलनाचे सोनू आझाद (उत्तर प्रदेश),केशर कलब्रेक्स(बिहार)आदी कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत. यावेळी राजाध्यक्ष दिपक जाधव,माळशिरस तालुकाध्यक्ष पोपट जमदाडे, इंद्रनील देशमुख,काकासाहेब माने-देशमुख, सुनील पाटील, राजू पाटील आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा