*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*
*सांगली----(पञकार)*
*मो;--8983 587 160
2019 आणि 2021 मध्ये सांगलीत महापुरासंदर्भात आणि आयर्विन पुलाच्या पाण्याच्या पातळी बद्दल मी भाकीत केले होते ते तंतोतंत खरे ठरले होते . त्याशिवाय पाणी किती फुटावर आल्यावर उतरेल हें देखील ठामपणे सांगितले होते .ते देखील खरे ठरले .
आज 2024 मध्ये सांगली आणि कोल्हापूर मध्ये भीषण परिस्थिती आ वासून उभी आहे. महापुराचा प्रलय आणि उध्दभवणारी परिस्थिती याचा वास्तवपणे घेतलेला हा मागोवा !
"2024 मध्ये सांगलीत पुन्हा 57 फूट?"
महापुराची भीषण *दाहकता* दुर्दैवी आणि कटू असते. अलमट्टी धरणाच्या अतिरिक्त पाण्याचा हव्यास आणि कर्नाटक सरकारचे "चुकीचे नियोजन" यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महापुराच्या समस्यांना सामोरे जावे लागते . कर्नाटकने अलमट्टी धरणातून 3-4 लाख क्यूसेस ने पाणी सोडले तरीही त्यांच्या कोणत्याही गावांना प्रत्यक्ष नुकसान होत नाही. कारण अलमट्टीच्या पुढेछोटे नारायण धरण आहे त्यात हें पाणी जाते ,त्यानंतर अन्यत्र हें पाणी वळवले जाते . प्रत्यक्ष कोणत्याही गावात धरणाचे पाणी विध्वंस करत नाही .म्हणूनच अलमट्टीतून "3 ते 4 लाख" क्यूसेस पाणी सोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दबाव आणायला हवा .
सांगलीचे काँगेसचे नूतन" खासदार- विशाल पाटील " यांनीही "लोकसभेत" ही मागणी केली होती .
तब्बल 1 महिना आणखी होणारा "धुवाधार" पाऊस आणि बंगाल च्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे सांगली कोल्हापूर शहरांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे . 2019 मध्ये सांगलीत 57.6 इतकी उच्चांकी पाणीपातळी झाली होती. आज पाणलोट क्षेत्रात होणारा प्रचंड पाऊस आणि कोयनेतून होणारा आज होणारा 40000 चा क्युसेसचा "विसर्ग" पाऊसाचा जोर वाढल्यावर 60000 पर्यंत होऊ शकतो . प्रचंड पाऊस आणि कोयनेचा विसर्ग यामुळे सांगलीत पाणीपातळी पुन्हा 57 फूट गाठणारचं या दृष्टीकोनातून प्रशासनाने पूर्वतयारी करावी . महापूर येऊच नये परंतु "सतर्कता" असणे हिताचे असते .कारण 2019 आणि 2021 च्या गतस्मृती अजूनही सांगलीकरांच्या "स्मरणात" आहेत .
सर्वसामान्याना होणारा त्रास आणि महाराष्ट्रात "50 हजार कोटी" रुपयांचे झालेले भयंकर नुकसान यामुळे यंदा 2024 मध्येही महापूर येणार का ? महापूर आला तर ते येण्यामागील काही ठोकताळे असू शकतात का ??
भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना 50000 हजारांची उल्लेखनीय भरीव मदत केली होती. सर्वसामान्यांसाठी हा थोडासा दिलासा होता .
,*महापूर पासून सुटका शक्य !*
2005 आणि 2021 मध्ये 5 लाखापेक्षा जास्त लोकांचे स्थलांतर आणि 40 हजार पेक्षा जास्त झालेली घरांचे नुकसान 50 हजार कोटींपेक्षा जास्त झालेले नुकसान यामुळे महापूर कोणालाही परवडणारा नाही. भविष्यात महापुराचा "विळखा" सुटू शकतो परंतु महाराष्ट्र शासन आणि कर्नाटक सरकार यांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमधील नसलेला सुसंवाद आणि स्थानिक इच्छाशक्तीचा अभाव यामुळे पाण्याच्या विसर्गाचे गणित चुकते. केंद्रसरकारचे धरणात ठेवण्यात असणाऱ्या पाण्याचे "धोरण" निश्चित आहे. पण कोणत्या महिन्यात किती पाऊस पडत आहे ??? किती धरणातून किती पाणी सोडायला पाहिजे ??? याचे ठोकताळे बांधणे गरजेचे आहे . योग्य नियोजन केले तर कधीच महापूर येणार नाही हें निश्चित !
*जागतिक बँकेचे 3200 कोटी !*
सांगली - कोल्हापूर मध्ये महापूर यंत्रणा सक्षमीकरण साठी साठी जागतिक बँक 3200 कोटी देणार आहे. देशात - महाराष्ट्रात चांगले रस्ते खराब दाखवून पुन्हा एकदा लाखो रुपयांच्या निविदा काढण्यात येतात, हा इतिहास आहे. तसाच प्रकार 3200 कोटी रुपयांसाठी झाला असेल का ??? किंवा जाणीवपूर्वक पूर्वनियोजित षडयंत्र असेल का ??? हा महापूर *मानवनिर्मित असावा का ?? अधिकारी जाणीवपूर्वक नियोजन करण्यास टाळाटाळ करतात का ??? माजी पाटबंधारे अभियंते महापूर येऊ नये म्हणून "जीवाची बाजी" लावत असतानाही नेटके नियोजन केले जातं नाही ? याचीही कारणमीमांसा करणे गरजेचे आहे . सांगलीत 57 फूट महापुराची पुनरावृत्ती होणार का ??सावध रहा ...बेसावध नको .!
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा