*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
यशवंतनगरता.माळशिरस परिसरात गेली सहा दिवसांपासून सकाळी 10 ते रात्री 9 वाजे पर्यंत वीज वितरण कंपनी कडून वीज प्रवाह वारंवार खंडित केला जात असुन. त्यामुळे परिसरातील उद्योग धंदे विस्कळीत झाले आहे याबाबत महावितरण वीज कंपनीकडे चौकशी साठी अधिकारी व वायरमन यांना विचारणा केली असता मेन लाईन पंचर आहे. घोटाळा सापडत नाही, काम चालू आहे अशी उडवा उडवी ची उत्तरे दिली जाते. गेल्या तीन महिन्यापासून दिवसातून 20 ते 25 वेळा नाहक दररोज वीज पुरवठा खंडित केला जात होता. त्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायिकांचे व्यवसाय शिवाय नागरिकांना याचा त्रास होत असून मुळा मध्ये अलीकडच्या काळात महावितरण वीज कंपनीकडून अव्वाच्या सव्वा विज बिल आकारून नागरिकांची पिळवणूक केली जात असताना सुद्धा नागरिक वीज बील प्रामाणिकपणे भरतात मात्र एखादा महिना वीज बील न भरल्यास विलंब झाला तर महावितरण कंपनीचे कर्मचारी त्या ग्राहकाचे वीज प्रवाह खंडित करतात तर मग ग्राहकांनी वेळच्यावेळी विज बिल भरून घेत असताना सुद्धा ग्राहकांना वीज पुरवठा वेळेवर आणि सुरळीत केला जात नाही त्यामुळे ग्राहकांची सहनशीलता संपली तर उद्रेक होण्याची संभावना नाकारता येत नाही शिवाय आता सकाळी 10 वाजले पासून रात्री चे 9 वाजेपर्यंत खंडित केला जाऊ लागला. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या उद्योगावर विपरीत परिणाम जाणवू लागला. जर खरेच वीज प्रवाहात अडचण आली असेल तर फक्त यशवंतनगर परिसरातच ही अडचण का ? यशवंतनगर च्या आजूबाजूच्या परिसरात ही अडचण का नाही, असा नागरिकांतून वीज कंपनीच्या कारभाराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यशवंतनगर परिसरास मेन लाईन निर्माण झाली आहे का ? आजूबाजच्या इतर परिसरातील वीज प्रवाह चालू कसा राहतो याबाबत सदर अधिकाऱ्याची चौकशी व्हावी व सत्य काय आहे ते कळावे असे नागरिकांतून बोलले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा