*विशेष -----प्रतिनिधी*
*राजु मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी
सातारा :---पाटण तालुक्यातील कोयना धरण आणि रत्नागिरी
जिल्ह्यातील पोफळी परिसराला आज बुधवारी दुपारच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला.
२.८ रिश्टर स्केलचा हा धक्का होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १३.६ किलोमीटर अंतरावर होता.
भूकंपामुळे धरणाला कोणताही धोका नाही अशी माहिती देण्यात आली.
कोयना धरण आणि परिसराला वारंवार भूकंपाचा धक्का बसतो. पाटण तालुक्यासह शेजारील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातही या भूकंपाचा केंद्रबिंदू राहतो. आतापर्यंत अनेक वेळा कोयना परिसराला भूकंपाचा धक्का बसलेला आहे. बुधवारी दुपारीही ३ वाजून २६ मिनिटांनी कोयना परिसराला भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर २.८ नोंद झाली आहे. हा धक्का सौम्य प्रकारचा होता.
या भूकंपाचा धक्का पाटण तालुक्यातील कोयनानगर तसेच शेजारील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्याच्या पोफळी परिसराला बसला.
या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १३.६ किलोमीटर अंतरावर होता. तसेच या भूकंपाची खोली १५ किलोमीटर होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा