*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 वी जयंती निमित्त यशवंत आंबेडकर बुद्ध विहार संस्थेच्या वतीने विहारांमध्ये त्यांची जयंती साजरी करण्यात आली .यावेळी संजय तडवळकर यांनी आणणाभाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर अभिमान जगताप यांनी विचार व्यक्त केले ग्रामीण भागातील वंचितांना न्याय देण्यासाठी सामान्य माणसाला आपल्या कथेचा नायक बनवून वास्तववादी विचार अण्णाभाऊंनी मराठी साहित्यामध्ये मांडले .अण्णाभाऊंच्या साहित्याने मराठी भाषेला ऊर्जित स्वरूप प्राप्त झाले . चळवळीतील नायक अण्णाभाऊंच्या कथासंग्रहातील पुन्हा परिवर्तनवादी कसा ठरला संघर्ष योद्धा कसा झाला हे व्यक्तिचित्र अतिशय मार्मिकपणे रेखाटले गेले आहे .असे गौरवपूर्ण उद्गार त्यांनी काढले यावेळी कांतीलाल भाले ' सोपान चंदनशिवे 'गणेश काटे 'मुरलीधर जगताप , दीपक लोंढे अधि कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊंना अभिवादन केले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा