*श्रीपूर---बी.टी.शिवशरण
सध्या महाराष्ट्रालातील समाजकारण राजकारण हे अत्यंत धोकादायक पातळीवर घसरले आहे जात धर्म आरक्षण व विशिष्ट घराणेशाही या मुद्द्यांवर लोकशाहीचा मजबूत असलेला स्तंभ डळमळीत होऊ पहात आहे येत्या दोन अडीच महिन्यांत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत आहे या पार्श्वभूमीवर दलित समाजाला राजकीय सत्तेत सामावून घेतांना सर्वच इतर राजकीय पक्ष दुजाभावाची वागणूक देत असल्याने दलित प्रतिनिधित्व कमालीचे बैचेन व अस्वस्थ आहे एकट्या दलित समाजाचे नावावर हा समाज सत्ता मिळवू शकत नाही कोणत्यातरी एका राजकीय पक्षाबरोबर दलित समाजातील संघटना पक्ष यांना युती व तडजोड करावी लागते मात्र दलित समाजात अनेक गट तट संघटना पक्ष वेगवेगळ्या माध्यमातून विखुरलेले आहेत त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांना अशी अडचण निर्माण होते की नेमके कोणाला युतीत सहभागी करून घ्यावे महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर रामदास आठवले जोगेंद्र कवाडे चंदकांत हांडोरे राजेंद्र गवई हे गट आहेत रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा गेल्या दहा वर्षांपासून भाजप बरोबर युतीत व सत्तेत सहभागी आहे जोगेंद्र कवाडे हे कांग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर युतीत आहेत राजेंद्र गवई हे स्वतंत्र त्यांच्या रिपब्लिकन पक्ष गवई गट म्हणून स्वतंत्र आहेत प्रकाश आंबेडकर यांनी वंचित घटकांना एकत्र करून वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे वंचित ने बर्या पैकी राज्यात आपलं सामाजिक राजकीय बस्तान बसवले आहे त्यांच्या लाखांनी सभा होतात त्यांच्या उमेदवारांना लाखांच्या वर मतदान झाले आहे प्रश्न असा आहे की हे सर्व दलितांचे नेतृत्व करणारे गट लहान पक्ष वेगवेगळ्या क्षेत्रात विखुरले आहेत त्यामुळे या गटांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत स्वःताच्या ताकदीवर सत्तेचा सोपान चढणे जिकिरीचे आहे विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मोठे यश प्राप्त करणे हे खूपच अवघड काम आहे या सर्व परिस्थितीचा लेखाजोखा मांडला तर जर दलितांना सत्तेपर्यंत पोहचायचे असेल तसेच निम्मी सत्ता प्राप्त करायचीच असेल तर गटा तटात विखुरलेले व दुसर्याच्या वळचणीला बसलेल्या या सर्वांचे ऐक्य होणं महत्वाचं आहे या साठी दलित समाजात सर्वोच्च स्थान व महत्त्व असलेले प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा नव्याने दलित ऐक्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे सर्व गटांतील घटकांना एकत्रित करून सामाजिक राजकीय पायाभरणी मजबूत व भक्कम केली तर महाराष्ट्रात विधानसभेत सत्तेत कोणत्या पक्षाला आघाडीला बसवायचे ही दलितांचे एकगठ्ठा मतदानाच्या ताकदीवर ठरू शकते दलितांच्या मतांचे पारडे जिकडे तिकडे सत्तेचा माहोल हे घडू शकते प्रकाश आंबेडकर यांनी वंचित घटकांना एकत्रित करून वंचित बहुजन आघाडी हा प्रयोग चांगला केला परंतु बौध्द समाज सोडला तर निवडणुकीत इतर जातींचे लोक वंचित बहुजन आघाडी ला एकगठ्ठा मतदान करत नाहीत हे गेल्या दोन पंचवार्षिकला लक्षात आले आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसला वंचित बहुजन आघाडी बरोबर एम आयमची युती असतांनाही सोलापुरात सर्व मुस्लिम मतदारांनी सुशीलकुमार शिंदे यांना मतदान केले होते त्यामुळे या दोघांच्या राजकीय चक्रव्यूहात भाजपचे सिध्देश्वर स्वामी निवडून आले होते तीच परिस्थिती चोवीस च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत निदर्शनास आली त्यामुळे दलित ऐक्यासाठी सर्वांनी एकजुटीने एकत्रित येणे काळाची गरज बनली आहे तमाम दलित समाजातून या सर्व नेतृत्व करणारे नेत्यांनी ऐक्याच्या प्रक्रियेत स्वतः हून पुढे येऊन प्रकाश आंबेडकर यांचे ऐक्य वादी नेतृत्व स्वीकारले पाहिजे तरच महाराष्ट्र विधानसभेत सत्तेचे गणित सोपे होऊ शकेल त्यावेळी मात्र ऐक्य वादी दलित नेतृत्वाकडे राजकीय पक्ष आघाडीचे नेते आमचे बरोबर निवडणूक युतीसाठी पायघड्या घालायला स्पर्धा करताना पहायला मिळेल हे लक्षात घेतले पाहिजे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा