Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

*पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षकाने - प्रशिक्षण घेणाऱ्या मुलीचा केला विनयभंग*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

माळेवाडी-अकलुज येथे अॕकॕडमी मध्ये पोलिसभरती पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षकांने एक प्रशिक्षण घेत असलेल्या मुलीचा विनयभंग केल्याने प्रशिक्षकाच्या विरोधात अकलुज पोलिस ठाण्यात गून्हा दाखल झाला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे याबाबत पोलिस सुञांकडून मिळालेली माहिती अशी कि 



मौजे माळेवाडी अकलुज ता. माळशिरस येथील अजीत चंद्रकांत चंदनकर रा. आलेगाव ता. माढा सध्या रा. माळेवाडी, अकलुज ता. माळशिरस जि. सोलापूर हे अॅकॅडमी मध्ये मुला/मुलींचे पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण घेतात. यातील पिडीत मुलगी सदर ठिकाणी प्रषिक्षणाचा सराव करत असताना दिनांक 26/01/2024 रोजी 10.00 वा ते दिनांक 27/07/2024 रोजी सायंकाळी 4.30 वा चे दरम्यान वेळोवेळी पिडीत मुलगी ही अनुसुचीत समाजाची आहे हे माहीत असताना देखील अजीत चंदनकर (आरोपीने) ‘‘तु मला खुप आवडतेस, तु माझेशी बोलत जा, तुमचे समाजातील ब-याच मुली माझे सोबत बोलत आहेत, तु पण माझे सोबत बोलत जा, तुला माझे जवळ शरीराने, मनाने यायला आवडेल’’ असे म्हणुन पिडीत मुुलीचे डावे हातास धरुन मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन सदरचा प्रकार ‘‘तु कोणास सांगीतला तर, तुझी वाट लावीन’’ असे म्हणुन शिवीगाळी करुन दमदाटी केली म्हणून मजकुरची तक्रार दिल्याने अकलुज पोलीस ठाणेस भारतीय न्याय संहिता भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, 75, 352, 351(2), 351(3) सह अनुसुचीत जाती आणि अनुसूचित जमाती (अत्यचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 चे कलम 3(1)(w)(i), 3(1)(w)(ii), 3(2)(va) अन्वये दाखल आहे. सदर गुन्हयातील आरोपीस अटक करण्यात आली असून एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. 

सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग, अकलूज हे करीत आहेत.


पोलीस निरीक्षक,

अकलुज पोलीस ठाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा