*सांगली------पञकार*
*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*
*मो;--8983 587 160
सावधान , कोणत्याही "डी. मार्ट" किंवा मोठया मॉल समोर "मोफत सेलिब्रेशन कुपन " देऊन आपली फसवणूक करणारी , मानसिक त्रास देणारी एक टोळी कार्यरत आहे .
त्यांच्याकडून मॉल मधून जाणाऱ्या लोकांना एक कुपन दिले जाते .व त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला जातो त्यानंतर 2 दिवसांनी त्या व्यक्तीला एक फोन येतो. 1800 लोकांमधून आपली निवड झाली आहे,आपण लकी विनर आहात,आपण नशीबवान आहात,आपण आपले बक्षीस घेण्यासाठी आमच्या ऑफिसला या असा "निरोप" दिला जातो.
1800 लोकांमधून निवड झाली आहे हें समजताच ती व्यक्ती आनंदी होतो आणि त्यांच्या ऑफिस जाण्यासाठी निघतो. ती व्यक्ती सहपरिवार जेंव्हा ऑफिस मध्ये जातो ,तेंव्हा तेथील वातावरण वेगळेच असते. बक्षीस समारंभची "तयारी" नसते .ऑफिसमध्ये गेल्यावर नाममात्र स्वागत केले जाते आणि "केबिन" मध्ये बसवले जाते. ऑफिसमध्ये गेल्यावर मोठे बक्षीस मिळेल या आशेने गेलेल्या व्यक्तीचा "भ्रमनिरास" होतो. कारण तेथे गोड - गोड बोलणाऱ्या स्टाफकडून " इन्शुरन्स" आणि अन्य गुंतवणुकीची भुरळ घालून 2 लाख रुपये भरण्याची गळ घातली जाते.
भव्य बक्षीस मिळेल , चारचाकी ,दुचाकी मिळेल किंवा सोन्याचे दागिने मिळतील या आशेने गेलेल्या लोकांना पश्चाताप होतो. कारण नसताना जबरदस्तीने गुंतवणुकीचे "व्याख्यान" ऐकावे लागते. तेंव्हा तात्काळ आपण फसवले गेलो आहे याची जाणीव होते . ऑफिस मधून परतताना 100 रुपयाचे काचेचे ग्लास "गिफ्ट" दिले जातात. जे चाणाक्ष असतात ,ते "वेळ" मारून नेतात ,आणि जे मोहमायेला आकर्षित होतात ,ते फसतात .
समोरच्याला बळीचा बकरा बनवून त्याची दिशाभूल करण्याचा हा "फंडा" नवीन आहे .
बक्षीस लागले म्हणून कित्येक लोक पावसात ,भिजत येतात. घाईगडबडीत अपघात होण्याची शक्यता असते . दररोज 10 लोकांना बोलावून त्यातील 1-2 लोक जरी फसले तरी त्यांना पुष्कळ असते .
जनतेने अशाप्रकारच्या बक्षीस लागले आहे म्हणून खोटे बोलून ऑफिसला बोलावणाऱ्या "फसव्या योजनेला" बळी न पडता समोरच्या व्यक्तीला ,त्यांनी कितीही आग्रह केला तरी आपला मोबाईल क्रमांक देऊ नये.
समस्त सांगलीकर जनता आणि महाराष्ट्रातील सर्वच मॉल परिसरातील येणारे ग्राहक या "फसवणुकीपासून" सुरक्षित राहतील ही अपेक्षा आहे .
. *इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा