*उपसंपादक-----नुरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
*माळशिरस तालुक्यातील सर्व सन्मानीय लोकप्रतिनिधी,पदाधिकारी, पत्रकार, व जनतेस तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रियांका शिंदे विनम्र अहवान करते की गेली महिनाभर झाले तालुक्यात पाऊस पडत असून व काहीच दिवसापूर्वी पालखी सोहळे आपल्या तालुक्यातून गेलेले आहेत तसेच जून ते ऑक्टोबर हा डासांचा पारेषण कालावधी असल्याने या काळात तालुक्यात कीटकजन्य व जलजन्य आजाराचे रुग्ण संख्या वाढत आहे त्यासाठी आरोग्य विभागा मार्फत घरोघर जाऊन कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत असून डास अळी आढळलेल्या ठिकाणी टेमीफॉस व गप्पी मासे यांचा वापर करण्यात आला असून उपकेंद्र व प्रा आ केंद्रात रक्त नमुने तपासणीसाठी घेऊन प्रयोग शाळेत पाठवले जात आहेत व योग्य उपचार केले जात आहेत तरी सर्वांनी कोरडा दिवस पाळून आपल्या घराचे आजुबाजुला असलेला परिसर स्वछ ठेवावा,गटारी व साचलेले पाणी वाहते करावे, कुलर फ्रीज मधील पाणी काढावे, जुने टायर डबे भंगार वस्तू नष्ट करावेत, नळ पाणी गळती काढावी, पाणी गाळून उकळून प्यावे मेडीकोलर चा वापर करण्यात यावा सध्या आशा स्व्यसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत घरोघर सर्वेक्षण करण्यात येत आहे त्यांना मदत करावी हि विनंती*
डॉ प्रियांका शिंदे
तालुका आरोग्य अधिकारी
पंचायत समिती माळशिरस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा