*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
इकडे वंचितचा रेशनकार्डधारकांचा मोर्चा प्रांतकार्यालयावर धडकला तिकडे पुरवठा अधिकारी यांची पंचनाम्याची व चौकशीची प्रक्रिया सुरू झाली
अकलूजमध्ये eKYC च्या नावाखाली रेशनधारकांची फसवणूक करत माल वाटप केल्याचे फिंगरप्रिंट घेतल्याने रेशन चा काळाबाजार नुकताच वंचितने समोर आणला आहे. याची जनतेत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्याने रेशन दुकानदारांनी आपली फसवणूक करून हक्काच्या मालावर डल्ला मारण्याचा प्रकार समोर आल्याने रेशनकार्ड धारकांकडून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रेशनधारकांना आवाहन करीत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते त्यानुसार हा मोर्चा प्रांतकार्यालयावर धडकण्याअगोदरच पुरवठा अधिकारी माळशिरस यांच्याकडून पंचनामा आणि चौकशीच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याची माहिती वंचितचे तालुकाध्यक्ष अभिजीत गायकवाड यांना स्वतः पुरवठा अधिकारी यांनी कॉल करून दिल्याने मोर्चा यशस्वी झाला आहे. शनिवारी अकलूजमधील प्रत्येक दुकानात स्वतः पुरवठा अधिकारी पंचनामा आणि ग्राहकांची चौकशी करणार आहेत आणि ज्यांना जुलै महिन्याच्या माल मिळाला नाही असे तक्रारीवरून समोर येईल त्यांना हा माल देण्यात येणार आहे. तरी रेशनकार्ड धारकांनी स्वतः उपस्थित राहत तक्रारी पुरवठा अधिकारी यांच्याकडे मांडायच्या आहेत. ग्राहक म्हणुन ही रेशनकार्ड धारकांची जबाबदारी असल्याने रेशनकार्ड धारकांनी स्वतः तक्रार करणे सर्वात जास्त महत्वाचे आहे. रेशन दुकानदारांच्या मनमानी कारभाराला चाप बसविण्यासाठी आणि ग्राहकांना हक्काचा माल व्यवस्थित मिळण्यासाठी रेशन संबंधित ग्राहकांनी स्वतःच्या तक्रारी जबाबदारीने मांडण्याचे आवाहन यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले. चळवळीचे कार्यकर्ते व मार्गदर्शक प्रकाश काले यांनी निवेदनाचा ड्राफ्ट तयार करून विविध मागण्यांचे निवेदन तयार केले. जिल्हा कोषाध्यक्ष अभिमान जगताप यांनी वंचितच्या वतीने प्रशासनावर ताशेरे ओढत शिस्त लागण्यासाठी कडक कारवाईची मागणी केली आणि ग्राहकांना बळ दिले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी अशोकदादा गायकवाड व त्यांचे सहकारी राहुल ढेरे यांनीही पाठिंबा व्यक्त करताना रेशनच्या गैरप्रकारावर तिव्र संताप व्यक्त करताना eKYC साठी पैसे घेतल्याचे पुरावे जाहीर करण्याचा ईशारा दिला. उपस्थित ग्राहकांनी आपले मनोगत व्यक्त करताना तिव्र संताप व्यक्त केला.
यावेळी वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष गोपाळकाका घार्गे देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष नौशाद शिकलकर, जिल्हा सदस्य रवी कांबळे, युवक आघाडीचे जिल्हा संपर्कप्रमुख नितीन सरवदे, तालुका संघटक विकास दळवी, युवक तालुकाध्यक्ष दर्शन सुरवसे, अकलूज शहराध्यक्ष सुनील कांबळे, शहर उपाध्यक्ष सूनका जाधव, मनोज जगताप, संपर्कप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांच्यासह शेकडोंच्या संख्येने रेशन कार्डधारक महिला व पुरुष उपस्थित होते आणि सर्वांच्या वतीने मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयाचे अधिकारी यांना देण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा